फुलंब्री शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवजयंती साजरी

फुलंब्री,२० फेब्रुवारी / प्रतिनिधी :- फुलंब्री शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महात्मा फुले चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाआरती करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

Displaying IMG-20220219-WA0090.jpg
माँसाहेब जिजाऊ यांची वेशभूषा केलेली चिमुकली स्नेहल इधाटे

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर व पोलिस निरीक्षक अशोक मूगदीराज यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय…! महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो…! जय भवानी, जय शिवाजी…! यासारख्या आदी विविध घोषणा देऊन परिसर दणाणून गेला होता. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनिल बोरसे, डॉ. सारंग गाडेकर, विलास उबाळे, योगेश पाथ्रीकर, साईनाथ बेडके, भा.ना. गाडेकर, संदीप शिंदे, संजय मोरे, सुष्मेश प्रधान, शिवाजी वाघ, जगदीश गोंडाळे, गणेश गोंडाळे, वसंत पाथ्रीकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.