औरंगाबाद जिल्ह्यात 99 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 41388 कोरोनामुक्त, 1034 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 02 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 82 जणांना (मनपा 72, ग्रामीण 10) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41388 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 99 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43572 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1150 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1034 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (83) रेल्वे स्टेशन परिसर (2), रोशन गेट (1), शिवशंकर कॉलनी (1), ठाकरे नगर (1), अविष्कार कॉलनी, सिडको (1), दत्त निवार एन 4 सिडको (1), पवन नगर सिडको (1), एन 7 शास्त्री नगर सिडको (1), देवळाई रोड, सातारा परिसर बीड बायपास (1), इग्मा, सुतगिरणी परिसर (1), देवानगरी (1), नारायण नगर, सातारा परिसर (1), एसआरपीएफ कॅम्प (1), मुकुंदवाडी (1), पडेगाव (2), एअरपोर्ट परिसर (1) औरंगाबाद सिटी (1), कामगार चौक सिडको (1), जालान नगर (1), जुना मोंढा (1), संघर्ष नगर, एन-2 सिडको (1), एन-8 सिडको (1), कांचनवाडी (1), एन सहा सिडको (2), रामगोपाल नगर, पडेगाव (1), उत्तरानगरी (1), राजेसंभाजी कॉलनी (1), एन चार सिडको (1), अन्य (52)

ग्रामीण (16) करमाड (1), वाळूज (1), फुलंब्री (1), महालगाव, वैजापूर (1), लासूर स्टेशन (1), अन्य (11)

एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत नवजीवन कॉलनी, हडकोतील 79 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.