खांडीपिंपळगाव येथील मारोती मंदिर सभामंडपासाठी आ.सतीश चव्हाण यांनी दिला 15 लक्ष रू. निधी

औरंगाबाद,२६ जून /प्रतिनिधी :- खांडीपिंपळगाव (ता.खुलताबाद) येथील भेंडाळा मारोती संस्थानच्या मारोती मंदिर सभामंडपाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी स्थानिक विकास निधीतून 15 लक्ष रूपयांचा निधी दिला असून आज या कामाचे भूमीपूजन आ.सतीश चव्हाण यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल यांची देखील विशेष उपस्थिती होती.

Displaying 2.jpg

          खांडीपिंपळगाव येथील प्राचीन काळातील असलेल्या मारोती मंदिराची मूर्ती सुमोर 350 वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे या मंदिराला विशेष असे महत्व असून औरंगाबाद जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणावर याठिकाणी दर्शनासाठी येतात. याठिकाणी मंदिर परिसरात सभामंडप करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी आ.सतीश चव्हाण यांच्याकडे केली होती. मंदिराचा प्राचीन इतिहास लक्षात घेता आ.सतीश चव्हाण यांनी देखील लागलीच सदरील मंदिराच्या सभामंडपासाठी त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून 15 लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. भूमीपूजनप्रसंगी बोलताना आ.सतीश चव्हाण म्हणाले की, खुलताबाद तालुक्यात वेरूळ येथील जगप्रसिध्द लेणी पाहण्यासाठी देशासह जगभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. खांडीपिंपळगाव येथील मारोती मंदिराचा इतिहास पाहता याला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळायला हवा. तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास या भागाचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. यासाठी मी व आ.प्रदीप जैस्वाल महाविकास आघाडी सरकारकडे पाठपूरावा करू असे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. 

          यावेळी मारोती मंदिर संस्थानच्यावतीने आ.सतीश चव्हाण व आ.प्रदीप जैस्वाल यांचा मारोतीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेश उबाळे, तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती किशोर कुकलारे, माजी सरपंच अशोक उबाळे, ग्रामपंचायत सदस्य महेश महालकर, बंडू श्रीखंडे, विष्णू चव्हाण, जगन्नाथ चव्हाण, मिठु महालकर, ज्ञानेश्वर दुधारे,  केदार कोकणे, पोपट काळे, रमजान पठाण, भरत कोकणे, संजय काळे, विजय कोकणे, रमेश महालकर आदींची उपस्थिती होती.