सरस्वती भुवनची सपना पुरी  झाली पोलिस उपनिरीक्षक

भराडी,​६​ जुलै / प्रतिनिधी :-अभ्यासातील सातत्य,आत्मविश्वास,जिद्द या बळावर येथील सरस्वती भुवन प्रशालेची विद्यार्थिनी सपना विष्णू पुरी हिची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नुकताच निकाल लागला त्यात तिने हे घवघवीत यश संपादन केले.सपना खातखेडा येथील रहिवाशी असून वडील शेतकरी आहेत.वडिलांकडे दीड एकर जमीन आहे आई अंगणवाडी मदतनीस आहे तिला एक मोठा भाऊ व एक बहीण आहे  बहिणीचे लग्न झाले आहे भाऊ सैन्यदलात आहे.

तिचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले पुढील शिक्षणासाठी तिने सरस्वती भुवन मध्येय प्रवेश घेतला. येथील प्रत्येक उपक्रमात सहभागी झाल्याने तिच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळाला. अकरावी बारावीच्या वर्गात तिला विविध परीक्षेच्या माध्यमातून बैठक मारून अभ्यास करण्याचा सराव झाला. येथेच स्पर्धा परीक्षेची गोडी लागली बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होताच  तिने पुढील शिक्षण स्पर्धा परीक्षेला पोषक असणाऱ्या कला शाखेतून घेतले.सपनाने छत्रपती संभाजीनगर येथे काकांच्या घरी राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.लेखी बरोबरच मैदानी परीक्षेचा कठोर सराव केला. मैदानी  सराव करताना प्रकृती खराब झाली पण तिने जिद्द सोडली नाही.सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास ,चिकाटी या बळावर  पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन करीत सपनाने आपले स्वप्न पूर्ण केले.

प्रशालेत मुख्यध्यापक युवराज पाडळे, पर्यवेक्षक संजय दाभाडे यांनी शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 

सत्कारापश्चात बोलताना सपनाने आपल्या यशाचे श्रेय गुरुजनांना देत आपला प्रवास उलगडून दाखवत भविष्यात आणखीन उच्च ध्येय गाठण्याचा मनोदय बोलून दाखविला

सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे