छत्रपती संभाजीनगर शहराची नव्याने ओळख निर्माण करणे गरजेचे – मुकुंद भोगले

छत्रपती संभाजीनगर,१९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- आपल्या शहराची नव्याने ओळख निर्माण करण्याची गरज आहे. नकारात्मक बाबी दूर सारून शहराचे बलस्थाने पुढे आणली पाहिजे. आपले शहर वारसा आणि संस्कृत, पर्यटन आदरातिथ्य, औद्योगिक क्लस्टर, कॉस्मोपॉलिटन संस्कृती असलेले शहर, शैक्षणिक केंद्र, चांगल्या आरोग्य सुविधा असणारे शहर म्हणून ओळख निर्माण व्हावी या साठी प्रयत्न व्हावे असे मत उद्दोगपती मुकुंद भोगले यांनी व्यक्त केले. 

मंथन परिसंवादादरम्यान शहराचे ब्रॅण्डिंग आणि ओळख या चर्चासत्रात अश्विनी देशपांडे – संचालिका, एलिफंट डिझाइन, अरित्र दास – सहाय्यक. उपाध्यक्ष, जेएलएल इंडिया आणि समित सचदेवा – अध्यक्ष सीआयआय, मराठवाडा झोन यांनी सहभाग घेतला.

गुंतवणुकीसाठी योग्य शहर असणाऱ्या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर चा समावेश करण्यात आला होता. हा अहवाल जेएलएल संस्थेने भारत सरकारच्या सहकार्याने बनविला होता अशी माहिती संस्थेचे सहाय्यक उपाध्यक्ष अरित्र दास यांनी दिली. ते म्हणाले की या अहवालाचे विविध देशातील भाषेमध्ये भाषांतर करण्यात आले होते, ज्याचा थेट परिणाम येथे येऊ घातलेल्या गुंतवणुकीवर होत आहे. शहराचे फार्मा, वाहन, इंजिनियरिंग क्षेत्रात मोठे नाव आहे.

अश्विनी देशपांडे म्हणाल्या की आपल्या शहराची स्वतंत्र ओळख आहे, जगात अनेक शहराने आपले बलस्थाने हेरून स्वतःची ओळख निर्माण केली आहे, आपण दुसऱ्या शहराची कॉपी ना करता या शहराला अधोरेखित करेल अशी ब्रॅण्डिंग करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाले.

समित सचदेवा यांनी येथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यान्वित असल्याचे सांगताना, ऑरिकच्या माध्यमातून आगामी काळात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. शहरातील स्किल असलेली मुले शिक्षणासाठी नोकरीसाठी मोठ्या शहरांचा पर्याय निवडतात, हे कुठे थांबले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले