अखेर बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला:२८ व ३० एप्रिलला मतदान 

छत्रपती संभाजीनगर,२१ मार्च  / प्रतिनिधी :-  तब्बल तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.  मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आला आहे.राज्यातील प्रमुख बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी २८ एप्रिल रोजी मतदान होईल तर तालुक्याच्या ठिकाणच्या बाजार समितीच्या निवडणूक ३० एप्रिल रोजी होणार आहेत. 

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव  डॉ. पी . एल . खंडागळे  यांनी याबाबतची माहिती दिली. बाजार समितीच्या निवडणूकीकरीता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतचे सदस्य मतदार असल्यामुळे सदस्यांची सूची बाजार समित्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तसेच गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मतदार यादीत सुधारणा करावी यासाठी राज्यातील काही जिल्ह्याच्या नागरिकांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.त्यानुसार 30 एप्रिलच्या आत निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहे. एकूणच आता बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोणता राजकीय पक्ष बाजारसमितीत बाजीगर ठरतो हे पाहणे  महत्वाचे ठरणार आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणच्या निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रम जाहीर : २७ मार्च  २०२३
अर्ज दाखल करण्याची मुदत : २७ मार्च  ते ३ एप्रिल २०२३
अर्ज छाननी : ५ एप्रिल वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी -६ एप्रिल 
अर्ज मागे घेण्याची मुदत : ६ एप्रिल  २०२३ ते २० एप्रिल  २०२३
उमेदवारांची अंतिम यादी जाहीर :२१ एप्रिल २०२३
मतदान : २८ एप्रिल २०२३मतमोजणी :तीन दिवसांच्या आत 
निकाल : मतमोजणी पूर्ण झाल्यावर लगेचच 
तालुक्याच्या  ठिकाणच्या निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रम जाहीर : २७ मार्च  २०२३
अर्ज दाखल करण्याची मुदत : २७ मार्च  ते ३ एप्रिल २०२३
अर्ज छाननी : ५ एप्रिल वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी -६ एप्रिल 
अर्ज मागे घेण्याची मुदत : ६ एप्रिल  २०२३ ते २० एप्रिल  २०२३
उमेदवारांची अंतिम यादी जाहीर :२१ एप्रिल २०२३
मतदान : ३० एप्रिल २०२३मतमोजणी :३० एप्रिल २०२३
निकाल : मतमोजणी नंतर लगेचच