वारसा आणि विकास यामधले संतुलन महत्वाचे : अजय कुलकर्णी

छत्रपती संभाजीनगर,१९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- ‘वारसा आणि विकास’ परस्परविरोधी असतात आणि त्यामुळे विकासाच्याप्रक्रियेत निर्णय घेताना संतुलन राखणे महत्त्वाचे असते असे मत जेष्ठ वास्तुविशारद अजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मंथन परिसंवादादरम्यान हेरिटेज आणि संस्कृती या चर्चासत्रात ते बोलत होते.
यामध्ये व्ही रंगनाथन – निवृत्त. मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य, पार्वती दत्ता  – संचालक महागमी गुरुकुल, तेजस्विनी आफळे – सल्लागार, एएसआय, अमोल गोटे, सहाय्यक संचालक राज्य पुरातत्व विभाग यांनी सहभाग घेतला.

पार्वती दत्ता म्हणाल्या कि शहराच्या वारशाचे मूर्त /अमूर्त पैलू ठळकपणे प्रदर्शित केले जावेत. हेरिटेजला कधीहीप्राधान्य दिले जात नाही, ज्यामुळे ओळखीसाठी प्रमुख घटकांपैकी एक आहे. आपण हीपरिस्थिती कशी बदलू शकतो आणि लक्ष केंद्रित कसे करू शकतो? याप्रसंगी शहर  जागतिक वारसा शहर म्हणून ओळख करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्नांची नितांत गरज असल्याची भावना समोर आली.

याप्रसंगी बोलतांना व्ही रंगनाथन म्हणाले कि वारसा संरक्षितकरण्यासाठी शासन आणि प्रशासनाची धोरणे आणि योजना महत्वाच्या आहे. हेरिटेज स्मारका भोवतीचे अतिक्रमण हे प्रमुख आव्हान आहे आणि ते जोरदारपणेहाताळले जाणे आवश्यक आहे, तसेच डीपी प्लॅन बनवताना हेरिटेजचा योग्य विचार करा असे त्यांनी सांगितले. जर नागरिकांना आपल्या शहराचा अभिमान आणि आपुलकी नसेल तर ऐतिहासिक वारशाचे जातं होणार नाही अशी भीती तेजस्विनी आफळे यांनी व्यक्त केली.