नांदेड जिल्ह्यात 101 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड दि. 19 :- सोमवार 19 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 212 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 101 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 26 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 75 बाधित आले.

आजच्या एकुण 413 अहवालापैकी 287 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 18 हजार 180 एवढी झाली असून यातील 16 हजार 130 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 446 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 45 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 18 ऑक्टोंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंधार तालुक्यातील कौठा येथील 82 वर्षाचा पुरुषाचा, लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील 72 वर्षाचा पुरुषाचा, देगलूरनाका नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुषाचा, सोमवार 19 ऑक्टोंबर रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे शिवाजीनगर कंधार येथील 60 वर्षाचा पुरुषाचा, नांदेड बसवेश्वरनगर 54 वर्षाचा एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 488 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 99 हजार 552निगेटिव्ह स्वॅब- 78 हजार 133एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 180एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 16 हजार 130एकूण मृत्यू संख्या- 488उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.29आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 379 रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 446आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 45

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.