भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त अनोख्या पद्धतीचे चित्र प्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर,६  एप्रिल / प्रतिनिधी :-  भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , अनोख्या पद्धतीचे चित्र चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष या सर्व सन्माननीय व्यक्तींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आले त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामधून आज भारतीय जनता पार्टी सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचली हे देखील या मध्ये गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला .

जनसंघ ते भाजपा पर्यंत प्रवास आतापर्यंत झालेले राष्ट्रीय अध्यक्ष , त्यांच्या कार्यकाल व त्यांच्या कार्यात विविध घडामोडी तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या त्यांच्या कार्य काळामध्ये झालेल्या भारतीय जनता पार्टीचा कार्य विस्तार या संबंधीची सविस्तर माहिती या चित्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली होती , त्याच बरोबर भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजी नगर शहर जिल्ह्यामध्ये भाजप  रुजवण्यामध्ये ज्या सर्व सन्माननीय जिल्हाध्यक्षांनी व ज्येष्ठ कार्यकर्ते नेत्यांनी काम करून भारतीय जनता पार्टी तळागाळा पण रुजवली त्या सर्व जिल्हा अध्यक्षचे  चित्र प्रदर्शनामध्ये  उल्लेख करण्यात आला आहे , त्या मध्ये भाजप संघटन मंत्री यांच्या कार्याचा देखील गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री आ.अतुल सावे , भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर ,शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर ,भाजपा प्रदेश सचिव प्रवीण घुगे , बापू घडामोडे ,भाऊराव देशमुख ,दयाराम बस्यै बंधू, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माधुरी अदवंत ,महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता ताई पालोदकर , अनिल मकरिये ,सुहास दाशरथे , प्रमोद राठोड ,इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या चित्र प्रर्दशनाचे उद्घाटन करण्यात आले , या मधून भारतीय जनता पार्टी  व जनसंघाचा कार्याचा इतिहास जनमानसापर्यंत रुजवण्या साठी हे चित्र प्रदर्शन खऱ्या अर्थाने लोकांसाठी लोक उपयोगी ठरेल व जनतेला भाजपाचा राष्ट्रवादी विचार याच्या साठी सर्व अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी केलेला त्याग या मधून , नवीन येणाऱ्या पिढीला  याची माहिती व्हावी या उदात्त हेतूने हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे.या अनोख्या पद्धतीचे चित्र प्रदर्शनाचे रूपरेखा तयार करणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्या मध्ये  सुहास दाशरथे , ऍडव्होकेट अमित देशपांडे , मंगलमुर्ती शास्त्री,प्रतीक शिरसे, यज्ञेश बसेयै   यांचा या वेळी सत्कार करण्यात आला .

लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा संकल्प करा-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई,६  एप्रिल / प्रतिनिधी :-  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीसह सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री . बावनकुळे बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, चित्रा वाघ, राज पुरोहित, कृपाशंकर सिंग, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले की , अत्यंत प्रतिकूल काळात हजारो कार्यकर्त्यांनी जनसंघ आणि त्यानंतर भाजपा ची विचारधारा रुजविण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावरच आज पक्ष उभा आहे. भारतीय जनता पार्टीची स्थापना करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी समृद्ध, विकसित, बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. नरेंद्र मोदी यांनी अटलजींनी पाहिलेले सर्वश्रेष्ठ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. त्यामुळेच भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे.

यापुढील काळात राज्यात पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेल्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करून मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारची विकास कामे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविली  पाहिजेत. ३ कोटी नवे सदस्य बनविण्याचे अभियान यशस्वी करण्याचा आणि शिवसेना युतीसह  लोकसभेच्या सर्व ४८ जागा, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी स्थापना दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.

यावेळी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते जनसंघापासून काम केलेल्या राम नाईक, मुकुंदराव कुलकर्णी, मधू चव्हाण, कांताताई नलावडे, दिलीप गोडांबे, कर्नल चौधरी, कर्नल देशपांडे, अनंत मराठे, शैला पतंगे – सामंत, दिलीप हजारे, भरत कारंडे, श्रीपाद मुसळे, बाबा कुलकर्णी आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.  

त्याआधी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाच्या आयुष्मान भारत सेल तर्फे आयोजित आयुष्मान भारत कार्ड वितरण कार्यक्रमाचा प्रारंभही श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला.