हृदयाच्या कोरोनरी धमनीनमधे होते कॅल्सिफाइड ब्लॉकेजेस: नवीन तंत्रज्ञानाने जीव वाचवला

महाराष्ट्रातील (मुंबई वगळता) पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर,१९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- हृदयाच्या कोरोनरी धमनीमध्ये अत्यंत गंभीर प्रमाणात कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजमुळे ६३ वर्षीय महिलेच्या छातीत सतत वेदना आणि श्वास लागणे ही समस्या होती. ही शस्त्रक्रिया करताना गंभीर कॅल्शियममुळे पेशंटला खूप धोका निर्माण होण्याची शक्यता असते. रुग्ण शहरातील नामांकित सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागात दाखल झाल्यांनतर सर्व बाबींचे अवलोकन करून ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी करून या महिलेचे प्राण वाचवले. धमनीमध्ये जमलेले कडक कॅल्सिफाइड ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी इंट्राव्हस्क्युलर लिथोट्रिप्सी (आयव्हीएल) या अद्ययावत तंत्राचा वापर करून त्यात या प्रकारातील नवीन आलेल्या C2 + ह्या कॅथेटर बलूनचा वापर करून रुग्णाची यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली.
हृदयाच्या ज्या रक्तवाहिनी असतात (कोरोनरी आर्टरीज्) ज्या मध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असेल तर हे कॅल्शियम अँजियोप्लास्टी करताना खूप मोठा अडथळा बनतात. या कॅल्शियम मुळे एन्जोप्लास्टी आणि स्टेण्ट करणं हे खूप अवघड जात त्यामुळे अशा प्रकारच्या कॅल्शियम असलेल्या रक्तवाहिन्यांसाठी कटिंग बोलून, स्कोर्ड बलून, रोटाब्लेटर आणि अशा मध्ये आलेलं एक इंट्राव्हस्क्युलर लिथोट्रिप्सी (IVL) नावाचं उपकरण यासाठी वापरल्या जातात. या इंट्राव्हस्क्युलर लिथोट्रिप्सी उपकरणांमध्ये हे कॅल्शियम सोनिक वेव्हनी (ध्वनिलहरीनी) ब्रेक केल्या जातात आणि या कॅल्शियमला ब्रेक केल्यानंतर मग तिथे दुर्बिणीच्या सहाय्यातून आत मध्ये बघून मग त्याला विशेष प्रकारचे बलून वापरून तो रस्ता मोकळा केला जातो. त्यानंतर स्टेन्टिंग केले जाते असे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. विलास मगरकर यांनी सांगितले,
स्टेन्टिंग झाल्यानंतर पुन्हा बलूनच्या साहाय्याने रक्त वाहिनीचा व्यास हा व्यवस्थित झालेला आहे हे दुर्बिणीच्या माध्यमातून बघितले जाते. अशा प्रकारच्या या आयव्हीएल तंत्रज्ञानामध्ये आत्तापर्यंत एक जी केबल उपलब्ध होतील ती फक्त सोनिक वेव्हच्या 80 पल्सेस देऊ शकत होती. महाराष्ट्रामध्ये प्रथमच मुंबई व्यतिरिक्त १२० पल्स देण्याची केबल वापरून एका रुग्णाला खूप गंभीर आणि लांबलचक कॅल्शियम ब्लॉक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या प्रकाराचा वापर करण्यात आला. हे जे कॅल्शियम कट केले आहे ते आयव्हीएल च्या C2+ बलूनच्या माध्यमातून हे करण्यात आलं आणि 48 मिलिमीटरचा लांब असा मेडिकेटेड स्टेण्ट टाकून या रुग्णाची एन्जोप्लास्टी करण्यात आली.
याच रुग्णाला जर इतरही रक्तवाहिन्यात ब्लॉक असले असते तर बायपास हा ऑप्शन होता पण हृदयाची एक नंबरची मुख्य धमनी डाव्या बाजूची एलएडी नावाची आर्टरी आहे त्यामध्ये ब्लॉक नसल्यामुळे बायपास हा पर्याय नव्हता आणि त्यामुळे याच रुग्णाला आयव्हीएल तंत्राद्वारे हे कॅल्शियम कट करून तिथे आपण अँजिओप्लास्टी करू शकलो.
हा रुग्ण या सर्व प्रकारांनी अत्यंत व्यवस्थित होऊन रिकवरी रॅपिड झाली. अशा प्रकारच्या कॅल्शियम असलेल्या रुग्णांमध्ये जर आपण हे कॅल्शियम कट करणारे उपकरण न वापरता जर अँजियोप्लास्टी केली तर रक्तवाहिनी फाटण्याचा आणि शस्त्रक्रिया करताना अधिक गुंतागुंत होण्याचा व मृत्यू होण्याचा प्रमाण हे साधारण पन्नास टक्क्यांपर्यंत असतं. त्यामुळे हे अत्यंत अद्यावत असे उपकरण ठरलेले आणि त्यातल्याही या उपकरणाच्या ॲडव्हान्स वर्जनचा इथे वापर करण्यात आलेला आहे”
या शस्त्रक्रियेत डॉ. विलास मगरकर यांना डॉ. प्रवीर लाठी, डॉ. रोहित वळसे, डॉ. देवेंद्र बोरगावकर, डॉ. मुनीर अहमद व भूलतज्ञ डॉ. सुजित खाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
सर्वच कॅथलॅब व सीसीयूच्या टीमने रुग्णाची पाच दिवसात दवाखान्यातील वास्तव्या दरम्यान व्यवस्थित काळजी घेतली. टीम वर्क मुळे सदर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुलभ पद्धतीने पार करणे शक्य झाले असे डॉ. मगरकर यांनी सांगितले.
या अद्वितीय कार्याबद्दल सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलचे विश्वस्त श्री. राजकुमार धूत, प्रशासक डॉ. हिमांशू गुप्ता व फायनान्स हेड श्री सुशील मंत्री यांनी सर्व कार्डिऑलॉजी विभागाच्या डॉक्टरचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
सेठ नंदलाल हॉस्पिटलने प्राप्त केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी औरंगाबाद येथील वैद्यकीय क्षेत्रातून कौतुक होत आहे तसेच समाजातील सर्व स्तरातील प्रतिष्ठित मंडळी कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे