वैजापूर येथील नागोबाबा मल्टिस्टेट बँकेच्यावतीने नेत्रचिकित्सा शिबीर ;102 जणांची तपासणी

वैजापूर,९ डिसेंबर /प्रतिनिधी :-सामाजिक दृष्टिकोनातून वैजापूर येथील नागोबाबा मल्टिस्टेट बँकेच्यावतीने बुधवारी येथे नेत्र चिकित्सा शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 102 नागरिकांची तपासणी करण्यात आली.

15 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 10 रुग्णांना चष्मा वाटप करण्यात आले.या शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते मेजर सुभाष संचेती यांच्याहस्ते झाले. ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात अहमदनगर येथील आंनद ऋषी नेत्रालयाच्यावतीने रुग्णांची तपासणी करण्यात आली. प्रास्ताविक बँकेचे शाखाधिकारी ज्ञानेश्वर सातपुते यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी शिल्पा बारगजे यांनी उपस्थितांचे आभार मानले.अमर लोधे, युनूस देशमुख,शिवानंद निंबाळकर,सतीश धारबळे,मयूर साळवे आदी यावेळी उपस्थित होते.