शहर विकास आराखड्यामध्ये लोकसहभाग महत्वाचा : असीम कुमार गुप्ता

छत्रपती संभाजीनगर,१९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शहराच्या पुढील २० वर्षाचा विचार करून विकास आराखडा बनविण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील सहा महिन्यात या आराखड्याचा मसुदा तयार होणार असून ही प्रक्रिया  केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांपुरती सीमित न राहता यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, सर्वसामान्यांना काय हवे हे विकास आराखड्यात आवर्जून आले पाहिजे कारण कोणत्याही शहराचा विकास आराखडा हा त्या शहराच्या शाश्वत विकासाची ब्लु प्रिंट असते असे मत राज्याच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी व्यक्त केले. ते छत्रपती संभाजीनगर फर्स्ट आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, स्मार्ट सिटी क्रेडाई, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, आणि मासिआ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मंथन 2.0 कार्यक्रमात बोलत होते.

यापुढे छत्रपती संभाजीनगर येथे मनपा आणि महानगर प्राधिकरण यांचा माध्यमातूनच विकास नियोजन करण्यात येणार असून या पुढे शहर विकास आराखडा बनत असतांना सभोलतालच्या परिसराचा देखील विचार केला पाहिजे. आगामी काळात वाळूज, शेंद्रा आणि बिडकीन या दिशेने शहरीकरण होणार असून विकास आराखडा करत असताना तो सर्वसमावेशक असावा तसेच एकमेकांस पूरक असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मंथन २ उपक्रमाचे कौतुक करताना असीम कुमार गुप्ता म्हणाले कि शहराच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत योग्य वेळी आलेली योग्य कल्पना असून, हि प्रक्रिया अव्याहतपणे सुरु राहिली पाहिजे. नगर विकास प्रधान म्हणून या शहराला कसा फायदा होईल याबाबत दक्ष राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

मंथन 2.0 चे उद्दिष्ट विविध भागधारक, आणि दूरदर्शी असलेल्या व्यक्तींना एकत्रितपणे आपल्या शहराचे भविष्य घडवण्यासाठी मंथनाच्या माध्यमातून प्रक्रिया सुरु केली आहे, त्यामधून शहरासाठी अमृत कसे मिळेल यासाठी मी अथक प्रयत्न करेल असे मत मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटी सीईओ जी. श्रीकांत यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी मनपा आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यामध्ये प्रामुख्याने सेप्टिक टाकी मुक्त शहर करणे, अंडरग्राउंड युटिलिटी एक्सप्रेस वे प्रकल्प, सेवा प्रदान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,महानगरपालिका शाळेचे अपग्रेडेशन, मुलांसाठी मैदाने, उद्यानाचा विकास या बद्दल माहिती दिली.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लोकसहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकसहभागातून खाम नदीचे पुनरुज्जीवन आणि रुंदीकरण, खोलीकरण केले ज्यामुळे गट काही वर्ष्यांमध्ये सखोल भागात पूर परिस्थिती उद्भवली नाही असे जी. श्रीकांत म्हणाले.

सकाळच्या पहिल्या सत्राचे उदघाटन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले, या प्रसंगी बोलताना ते म्हणाले कि, शहराचे नैसर्गिक आपत्ती मूल्यांकन हा एक महत्त्वाचा घटक आहे. भौगोलिकदृष्ट्याआपले शहर या पैलूंवर चांगले आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काही प्रकल्प महत्वाचे असतात, त्या मध्ये आडकाठी आल्यास त्याचे दुष्परिणाम त्या शहराला भोगावे लागतात. G20 बैठकीच्या वेळी आपण शहरात अमुलाग्र बदल पहिला, त्याची पुनरावृत्ती नेहमीसाठीच होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले अद्वितीय प्रात्यक्षिक करू शकतो, तेव्हा तत्सम पुनरावृत्ती होऊ शकते.

सध्या जिल्हा धोरणात्मक अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे यावर विधायक अजेंडावर नागरिक मंच आणि प्रशासन यांचा नियमित संवाद व्हावा यासाठी छत्रपती संभाजी नगर फर्स्ट ने पुढाकार घ्यावा अशी सूचना त्यांनी केली.

उद्धाटन समारंभात राज्याचे माजी मुख्य सचिव व्ही. रंगनाथन यांनी सुव्यवस्थित आणि नियोजनबद्ध विकासासाठी लगतचा परिसर शहरामध्ये समाविष्ट करण्यावर जोर दिला पाहिजे, तसेच मेट्रोचे नियोजन प्राधान्याने केले पाहिजे असे मत व्यक्त केले.शहरातील मोकळ्या जागा कशा विकसित करायच्या याचे सूक्ष्म नियोजन गरजेचे आहे. राजकीय आणि प्रशासकीय नेतृत्वाच्या पलीकडे, शहरातील विविध संघटना आणि सामान्य माणसांचा सहभाग शहर नियोजनासाठी अत्यंत गरजेचं आहे. दबाव गट म्हणून येथील संघटना चोख काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. एएतिहासिक वारसा जपत असताना हेरिटेज इमारतीची ओळख, मॅपिंग आणि संरक्षण, तसेच ऑडिओ – व्हिज्युअल रूपात – हेरिटेज स्थानांबद्दल लिखित माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती संभाजीनगर फर्स्ट चे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी या उपक्रमाचा उद्देश सांगताना म्हणाले कि शहरात अनेक त्रुटी आहे त्याच वेळी शहराची अनेक बलस्थाने आहेत. एकीकडे औद्योगिक प्रगती मोठ्याप्रमाणावर अपेक्षित असतांना पायाभूत सुविधांचा वेग त्याच प्रमाणात वाढणे आवश्यक आहे. येथील नागरिकांच्या शहराबद्दल काय अपेक्षा आहे त्याचा या शहराच्या विकासामध्ये कसा सहभाग वाढेल या करीत मंथन उपक्रम राबिण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

या वर्षीचा मंथन गाभा डेटा आधारित निर्णय (डेटा ड्रिव्हन डिसिजन -Data Driven Decision ) असणार असून, आजचा कार्यक्रम हि केवळ सुरवात आहे. या चर्चेतून समोर आलेल्या मुद्यांचा सविस्तर अहवाल तयार करून तो शासनाला सादर करण्यात येईल असे या मंथन २.० चे निमंत्रक मुकुंद भोगले म्हणाले. यावेळी अजय कुलकर्णी, मुनीश शर्मा, महाराष्ट्र क्रेडाई अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्रेडाई औरंगाबाद अध्यक्ष विकास चौधरी, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया आणि मासिआ अध्यक्ष अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश दाशरथी आणि मुकुंद कुलकर्णी यांनी केले.

सामाजिक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असलेल्या छोट्या पथदर्शी प्रकल्पांवर काम करा: अविनाश पाटील
 
पश्चिम महाराष्ट्र आणिकोकणात शहराचे शहर नियोजन प्रभावीपणे केले मराठवाड्याठी त्याची अंमलबजावणी व्हावी याची सुरवात सामाजिक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असलेल्या छोट्या पथदर्शी प्रकल्पांने केली पाहिजे. अतिक्रमण असलेल्या वास्तू अधोरेखित करून त्याबाबत योग्य पाऊले उचलली पाहिजे असे मत राज्याच्या नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. शहर पायाभूत सुविधा या चर्चासत्रात ते बोलत होते.

चर्चासत्राच्या सुरवातीला पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी शहरातील वाहतूक समस्येबद्दल बोलताना येथील लोकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता बोलून दाखवली. वाहतूक शिस्तीचे अयोग्यपालन, लोकसंख्येची एकाग्रता आणिवाहनांची लोकसंख्या, पार्किंग समस्या, ऑटो रिक्षा स्टँडचा अभाव यामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बाह्य  रिंग रॉड, आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था येथील प्रश्नांना काही अंशी सोडवू शकतील असे मत त्यांनी व्यक्त केले. 

या चर्चासत्राचे संचालन करत असतांना मुनीश शर्मा म्हणाले कि या शहराने ९० च्या दशकात विकासातही गती पकडली होती, त्या वेळी झालेल्या विकाच्या जोरावर आज आपण या स्थिती आहे, त्यानंतरच्या काळात आपण संधी गमावली, आत पुन्हा विकासाची संधी चुकविणे शहरासाठी घटक ठरेल.

चर्चासत्रात बोलतांना मनपा आयुक्त ताठ प्रशासक जी  श्रीकांत म्हणाले कि शहरासाठी हॉचपॉट डेव्हलपमेंट विइंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच  मास्टर प्लॅन आवश्यक आहे. आपण पुढील १००/२००वर्षांसाठी काय वारसा निर्माण करणार आहोत याचा विचार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.