पुरवणी अर्थसंकल्पात बियाणे उद्योगांसाठी निश्चितचं फलदायी निर्णय – समीर पद्माकर मुळे

समीर पद्माकर मुळे

अध्यक्ष, ‘सियाम’

छत्रपती संभाजीनगर,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-‘जय जवान जय किसान जय विज्ञान’ सोबत ‘जय अनुसंधान’ असा नवा नारा पंतप्रधानांनी दिला आहे. संशोधनाला महत्त्व मिळेल. सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर दिला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जात आहे. आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून ११.८ कोटी शेतकऱ्यांना मदत केल्याचे दिसून येते आहे.           

देशातील ४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच शेतीसाठी आधुनिक साठवण केली जाणार असून पुरवठा साखळीवर भर देण्यात येईल. याशिवाय, सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला आणखी प्रोत्साहन देणार आहे. 

       दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार आहे. कृषी स्टार्टअप्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. ८० कोटी लोकांच्या मोफत रेशनद्वारे अन्नाची चिंता दूर झाली. अन्नदात्याची उत्पादनासाठी एमएसपी वेळोवेळी वाढवली जात आहे. मुलभूत गरजांच्या तरतुदीमुळे ग्रामीण भागात खरे उत्पन्न वाढले आहे. 

       बियाणे, कृषी विषयक आणि इतर उद्योगासाठी प्रोत्साहन व योग्य त्या वातावरणाची गरज असून सातत्याने निसर्गाच्या लहरींमुळे तसेच पूर्णपणे हवामानावर अवलंबून असणाऱ्या बियाणे उद्योगाला या अर्थसंकल्पाकडून खूप काही अपेक्षा होत्या. पण यावर्षी पण काही सवलती किंवा सहाय्य जाहीर झाले नाही पण आम्ही सकारात्मक आहोत. 

      येणाऱ्या पुरवणी अर्थसंकल्पात आमच्या बियाणे उद्योगांसाठी निश्चितचं काही फलदायी निर्णय, सहाय्य किंवा प्रोत्साहन मिळेल. अशी आशा बाळगतो.