औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन तर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर,१९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- जागतिक छायाचित्र दिनानिमित्त औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन तर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते  झाले. 

यावेळी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर , देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक उल्हास  शिरूरकर, उपप्राचार्य दिलीप खैरनार व असोसिएशनचे अध्यक्ष किशोर निकम उपस्थित होते.
डॉ.भगवत कराड यांचा  सत्कार किशोर निकम यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रास्ताविक करताना किशोर निकम म्हणाले की औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशनच्या कार्यालयाची आणि एक शहरासाठी एक आर्ट गॅलरीची मागणी किशोर निकम यांनी केली.

त्यावर उत्तर देताना भागवत कराड म्हणाले की  कार्यालयाच्या  जागेसाठी मी आजच महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्याशी बोलून ताबडतोब ही कार्यवाही करण्याचे सांगतो. त्याचबरोबर शहरासाठी एक सुंदर आर्ट गॅलरी कशी निर्माण होईल याचाही लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले.मुद्रा लोन साठी सर्वांनी लवकरात लवकर फाईल माझ्याकडे द्यावी हे माझे वैयक्तिक लक्ष घालून सर्वांचे फाईल मंजूर करून देतो असेही डॉ.कराड म्हणाले.

यावेळी छायाचित्र प्रदर्शनाची सर्वांनी लाभ घेतला.यावेळी भूषण मुधलवाडकर, रमेश रावळे, सुनील गायकवाड, नितिन शेजूळ विशाल मित्रे, किरण तंबोळी, संकेत कुलकर्णी,भीमाशंकर नावंदे, महेश कपाडिया, विनोद मकुडे , सतीश साखरे ,सचिन गोडसे, राहुल पवार, दीपक काकड़े , बसवराज जिबकाटे , सुनील छत्रे , प्रकाश नागपुरकर , स्वप्निल उपाधे, गीताराम कांबले , सतीश जोशी,  बैजू पाटिल ,सुनील थोटे, चंदू थोटे , योगेश लोंढे, अरुण तळेकर , गणेश जेजुरकर , आदि छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन रमेश रावळे व आभार प्रदर्शन सुनील गायकवाड यांनी केले.