छत्रपती संभाजीनगरात कडकडीत  बंद 

(सर्व छायचित्रे :चंद्रकांत थोटे )

अंतरवाली सराटी (जिल्हा जालना ) येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यात  बंद पुकारण्यात आला .या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. वकिलांनी लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेधही नोंदवला आहे.क्रांती चौकात दिवसभर सरकार विरोधात निदर्शने, हाल्लाबोल, रस्ता रोको, बोंबा-मारो व जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दोन मुलांनी दगड फेक केल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कॅनॉट गार्डन 
शहागंज
पैठण गेट

छत्रपती संभाजीनगरात शनिवारी दिवसभर रस्ता रोके, निदर्शने आंदोलन करण्यात आले. सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी सर्वच बाजारपेठ बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला. पैठण गेट, गुलमंडी, शहागंज,कॅनॉट गार्डन आदी प्रमुख बाजारपेठ कडकडीत बंद होत्या. रस्ते ओस पडले होते.

वकिलांनी लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेधही नोंदवला