‘तुम्ही थांबणार आहात की नाही’ अजितदादांचा थेट शरद पवारांना सवाल

मुंबई :-‘ आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले. माझ्याकडूनही घोडचूक झाली होती. मी सुद्धा तिथे बसलो होतो. काल आता जर वय जास्त झालं, ८२ झालं, ८३ झालं, आता तुम्ही थांबणार आहात की नाही, तुम्ही आशीर्वाद द्याना. तुम्ही शतायुषी व्हावं’ असं म्हणत अजित पवार यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वयावर भाष्य केलं.

राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाचा मेळावा मुंबईत सुरू आहे. यावेळी अजित पवार यांनी जोरदार भाषण करत थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे.

‘आजही ते माझं दैवत आहे आजही ते श्रद्धास्थान आहे. एखादा माणूस नोकरीला लागला की ५८ व्या वर्षी रिटायर होतो. राजकीय जीवनात असेल तर भाजपमध्ये ७५ व्या वर्षी रिटायर केलं जातं. चुकलं तर सांगा अजित तुझं चुकलं, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो ही चूक आहे आमची? वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीवर गेले. माझी घोडचूक झाली तेव्हा मीही गेलो होतो. वय ८२ झालं ८३ झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही, तुम्ही आशिर्वाद द्या ना. तुम्ही शतायुषी व्हावं.२ मे ला सांगितलं मी राजीनामा देतो, तुम्ही सगळे प्रमुख बसा कमिटी बनवा आणि सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा असं सांगितलं. आम्ही तयार होतो. मग दोन दिवसात काय घडलं कुणास ठावूक,. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला तेही कळलं नाही. आमच्यामध्ये धमक किंवा ताकद नाही का सरकार चालवायची. महाराष्ट्राच्या राजकारणात जे चार पाच प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्यात माझं नाव येतं का नाही. मग मला आशिर्वाद का दिला जात नाही.शेतकरी मुलगा २५ वर्षाचा झाला की सांगितलं जात आता तू शेती बघायची मी सल्ला देतो. मी सुप्रियालाही बोललो, ते हट्टी आहेत. असला कसला हट्ट आहे’ असा सवालही अजितदादांनी केला.