श्रीक्षेत्र सराला बेटच्या दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान ; हजारों भक्तांचा वारीत सहभाग

वैजापूर ,१३ जून/ प्रतिनिधी :- श्रीक्षेत्र सराला बेट अर्थात गोदाधाम येथील भक्तांच्या दिंडीचे आषाढी एकादशीसाठी पंढरपुरला आज प्रस्थान झाले.
सत्कर्मांनीच कर्म शुद्ध होऊन दु:ख दूर होऊ शकते. भक्तीयोग आणि कर्मयोग वेगळा नाही तर ते दोन्ही एकमेकांना परस्परपूरक आहेत. भक्तीद्वारे कर्म करण्याचे ज्ञान मिळते. पंढरीची वारी भक्ताच्या दुःख निवारण्यासोबतच बळीराजाला संकटाचा सामना करण्यासाठी बळ देणारी ठरो अशी प्रार्थना गोदाधामचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी केली.  जवळपास दोन हजार वारकऱ्यांसह दिंडीचे पंढरपुरला प्रस्थान केले. गोदाधाम बेटाच्या दोनशे वर्षाच्या परंपरेला खंड न पडू देता ही दिंडी टाळ मृदंगाच्या गजरात गोदावरीच्या कुशीतून बाहेर पडली आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही विठ्ठलाकडे यंदा भरपुर पाऊस पडु दे. शेतात भरपूर पिकू दे अशी प्रार्थना करणार आहोत असे महंत रामगिरी महाराज म्हणाले.

श्रीक्षेत्र सराला बेट ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास आज, मंगळवरी बेटात महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते समाधी पुजन करून प्रारंभ करण्यात आला. शिस्तप्रिय म्हणून ओळख असणाऱ्या दिंडीत फडावरील असंख्य वारकरी सहभागी झाले आहेत.यावेळी उपस्थित वारकरी भाविकांना संबोधित करताना महाराज म्हणाले की,वारी भाविकांच्या जीवनातील दुःख दुर करते. सदगुरु गंगागिरी महाराज वारीला जातानी स्वतःच्या कुटियाला आग लावून निष्काम भावनेने वारी करत आज परंपरागत समाधी पुजन करुन दिंडीला चाललो आहोत.आता परतून येई पर्यंत संपूर्ण देशात पाऊस होऊन शेतकऱ्याची शेती पंढरी हिरवागार शालू परिधान करू दे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली .

यावेळी श्रीरामपूरचे प्रांत ॶधिकारी किरण पाटील सांवत, तहसीलदार वाघचौरे, माजी  नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, संजय बोरनारे, संभाजी डांगे, भाऊलाल सोमासे, सचिन जगताप, दत्तु खपके, संदीपान महाराज, योगानंद महाराज, रामभाऊ महाराज श्री क्षेत्र सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज उपस्थित होते.