भारताच्या कोविड मृत्यु दरात आणखी घट होत तो आता 2. 28%
एकूण बरी होणारी रुग्ण संख्या नऊ लाखांवर
नवी दिल्ली 27 जुलै 2020
केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांचा रोख हा अधिकाधिक कोविड चाचण्या करून लवकरात लवकर बाधित रुग्ण शोधणे आणि त्यांचे विलगीकरण करून त्वरित वैद्यकीय व्यवस्थापन करण्यावर आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून , मृत्युदर सतत कमी होत असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

सर्वांगीण वैद्यकीय उपचार सेवेवर आधारित वैद्यकीय व्यवस्थापन नियमावली, प्रभावी प्रतिबंध धोरण आणि अधिकधिक चाचण्यांमुळे रुग्णांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात घसरत असून तो आता 2.28% आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्युदर असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.

प्रतिदिन तीस हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा पायंडा सलग चौथ्या दिवशीही कायम असून गेल्या 24 तासात 31 हजार 991 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 9,17,567 झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 64 % आहे.
घटलेला मृत्युदर आणि बरे होणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आता सक्रिय रुग्णांच्या (4,85,114) संख्ये पेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 4,32,453 ने जास्त आहे. घरी राहणाऱ्या तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवा सतत पुरवली जात आहे.
43,000 हून अधिक केंद्रांमध्ये केवळ एकाच आठवड्यात 44 लाखांहून अधिक व्यक्तींनी दिली भेट
कोविड-19 संक्रमण काळात, भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची लवचिकता दिसून आली. विशेषतः ग्रामीण भागात सातत्यपूर्ण कार्यरत असलेल्या आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र यांच्या माध्यमातून कोविडेतेर आरोग्य सेवांचा अविरत पुरवठा केला तसेच कोविड-19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनातील तातडीच्या निकड पूर्ण केल्या.
महामारीच्या काळात (जानेवारी ते जुलै 2020 दरम्यान) जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचता येईल यासाठी अतिरिक्त 13,657 आरोग्य आणि कल्याण केंद्र सुरु होती. 24 जुलै 2020 रोजीपर्यंत देशाच्या विविध भागात एकूण 43,022 आरोग्य आणि कल्याण केंद्र कार्यरत होती.
18 जुलै ते 24 जुलै या आठवड्यात, एकूण 44.26 लाख नागरिकांनी आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रांचा लाभ घेतला. तर, आतापर्यंत म्हणजे 14 एप्रिल 2018 रोजी आरोग्य आणि कल्याण केंद्रांची सुरुवात झाल्यापासून एकूण 1923.93 लाख व्यक्तींनी या सेवेचा लाभ घेतला आहे. ही एचडब्ल्युसीची समाजासाठीच्या कार्याची साक्ष आहे. कोविडोत्तेर आरोग्यसेवा अनविरतपणे सुरु राहतील, याकामी यांची अतिशय महत्त्वाची भूमिका होती.
एबी-एचडब्ल्युसीनी देशभरात गेल्या आठवड्यात 32,000 योग सत्रांचे आयोजन केले. तर, आतापर्यंत एकूण 14.24 लाख योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त एचडब्ल्युसीजनी असंसर्गजन्य रोगांच्या व्यापक तपासणीत मोठी भूमिका बजावली आहे. गेल्याच आठवड्यात उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या 3.83 लाख व्यक्ती, मधुमेह असलेल्या 3.14 लाख, मुख कर्करोगाच्या 1.15 लाख, स्तनांचा कर्करोग असलेल्या 45,000 आणि 36,000 गर्भाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांची तपासणी केली आहे. स्थापनेपासून आतापर्यंत एचडब्ल्युसीनी, 4.72 कोटी उच्च रक्तदाब, 3.14 कोटी मधुमेह, 2.43 कोटी मुख कर्करोग, 1.37 कोटी स्तनांचा कर्करोग आणि 91.32 लाख गर्भाशयाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची तपासणी केली आहे.
एबी-एचडब्ल्युसीजनी संक्रमण काळात लोकसंख्या आधारीत असंसर्गजन्य रोगांविषयी तपासणी करुन राज्य आरोग्य प्राधिकरणाला माहिती पुरवली आहे तसेच कोविड-19 पासून संरक्षणासाठी जुनाट आजार आणि आजाराला बळी पडू शकणारे, सह-रुग्णता लोकसंख्येची यादी पाठवली आहे. सह-रुग्णता असलेल्यांची तपासणी करुन वेळीच सल्ला देण्याच्या त्यांच्या क्षमतेने जनतेचा विश्वास जिंकला आहे. एचडब्ल्यूसी चमूने लसीकरण सत्रांचे आयोजन करुन टीबी, कुष्ठरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांना आवश्यक औषधे पुरविण्याव्यतिरिक्त गर्भवती महिलांची वैद्यकीय तपासणी सुनिश्चित केली.