वाढत्या महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर वैजापूर शहर व ग्रामीण भागात स्वाक्षरी मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

वैजापूर ,१० नोव्हेंबर /प्रतिनिधी :- जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दरवाढी विरोधात शिवसेनेतर्फे जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून बुधवारी वैजापूर शहर व तालुक्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शहर व तालुक्यात सकाळी दहा ते दुपारी एक यावेळेत गट व गणनिहाय महागाई विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

Displaying IMG_20211110_143437.jpg


वैजापूर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आ.रमेश पाटील बोरणारे,माजी नगराध्यक्ष साबेर खान,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप ,तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी,शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलनांतर्गत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.याठिकाणी लावण्यात आलेल्या मोठ्या फलकावर 2014 चे दर आणि सध्याचे दर अशी तुलनात्मक माहिती लिहीली होती त्यावर वाचा आणि स्वाक्षरी करा व आक्रोश व्यक्त करा असे लिहलेले होते.

महागाई विरोधातील या स्वाक्षरी मोहिमेस शहरातील नागरिक व कार्यकर्त्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मोदी सरकारने 2014 मध्ये महागाईविषयी केलेल्या घोषणा हवेतच विरल्या असून सर्व जीवनावश्यक वस्तूंसह बँकिंग सेवा,बांधकाम साहित्य,रासायनिक खते व बी-बियाणे यांचे भाव गगनाला भिडले आहेत.यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या महागाई विरोधात आज स्वाक्षरी मोहीम राबवून जन आक्रोश आंदोलन करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया आ.बोरणारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

माजी नगराध्यक्ष साबेर खान हे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सातत्याने वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणितच बिघडले असून केवळ जीवनावश्यक वस्तूच नव्हे तर पेट्रोल – डिझेलसह इतर वस्तूंचे भाव वाढले आहेत त्यामुळेच या महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.
या जनआक्रोश आंदोलनात शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कल्याण जगताप, रणजीत चव्हाण,नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, डॉ.निलेश भाटिया, इम्रान कुरेशी, डॉ.रुपेश भोपळे,डॉ.संतोष गंगवाल, युवासेनेचे अमीर अली, श्रीकांत साळुंके,लिमेश वाणी, प्रमोद कुलकर्णी,महेश बुणगे,बाळासाहेब जाधव,वसंत त्रिभुवन,भाऊसाहेब पाटील गलांडे, हाजी खलील मिस्तरी, बळीराम राजपूत, सलीम वैजापुरी,कपील खैरे,बिलाल सौदागर,ज्ञानेश्वर टेके,पारस घाटे,बबन त्रिभुवन, कमलेश आंबेकर, खंडू पाटील गाढे,कृष्णा धने, सुरेश शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.लासुरगांव येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनाजी पाटील मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी सरपंच वसंतराव हुमे, उपसरपंच हितेश मुनोत, किशोर धुमे,विष्णू शेजुळ, भीम भाऊ हुमे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.