वैजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. दिनेश परदेशी यांचा सत्कार

वैजापूर ,१३ जून/ प्रतिनिधी :- आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रत्येक मतदारसंघात निवडणूक प्रमुखाची नियुक्ती केली आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल वैजापूर शहरातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मजिद कुरेशी, गोविंदसेठ धुमाळ, राजूसिंग राजपूत, नगरसेवक राजेश गायकवाड, दशरथ बनकर, सोमू सोमवंशी, डॉ हेडगेवार पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत कंगले, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, गौरव दोडे, शैलेश पोंदे, गणेश खैरे, अभिजित सोनी, महेश भालेराव, जाकीर कुरेशी, फिरोज पठाण,प्रेमसिंग राजपूत, किरण व्यवहारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.