नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ ; वैजापूर शहरातील पालिका शाळांची साफसफाई

वैजापूर ,१४ जून  /प्रतिनिधी :- या वर्षाच्या 2022- 2023 या शैक्षणिक वर्षास सोमवारपासून प्रारंभ झाला  असून आज प्रत्यक्ष शाळांची सफाई, सुशोभीकरण व कोविड बाबत जागृती असा कार्यक्रम होता याचा भाग म्हणून  येथील श्री. स्वामी समर्थ विद्यालयात स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी शाळा स्वच्छता करण्यात सहभाग घेऊन शिक्षकांना कोविडलसीकरण बाबत मार्गदर्शन केले. 

शाळा समिती  व्यवस्थापन अध्यक्ष राजेंद्र पाटील साळुंके, मुख्याध्यापक आर.डी.वसावे, शिक्षक पी.एच.वैद्य, आर.के.सोमासे, एस.पी.शेलार, के. आर.साळुकर,;डी.जे.खैरनार, जे.सी.पाटील, के. डी.ढेपले, के.आर.पवार, एम.आर.चौधरी, एस. एस.धुमाळ, श्रीमती के.बी.वाकळे आदी यावेळी उपस्थित होते. प्रत्यक्ष विद्यार्थी प्रवेश बुधवार पासून होणार आहे. शहर व तालुक्यातील  सर्वच शाळांत आज सफाई करण्यात आली. शाळा स्वच्छ करण्यात आल्या व कोविड बाबत जागृती व प्रबोधन करण्यात आले.