वैजापुरात जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्त तपासणी शिबिर

वैजापूर ,१३ जून/ प्रतिनिधी :- जागतिक रक्तदान दिनानिमित्त वैजापूर येथील जे.के.जाधव महाविद्यालयात मंगळवारी रक्त तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले.

जगातील सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान आहे. रक्तदान केल्याने कोणतीही शारीरिक हानी होत नाही. रक्तदानाने एखादया व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तिला नव्याने जीवन जगता येऊ शकते यासाठी सामाजिक बांधिलकी जपत समाजातील पात्र व्यक्तींनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाचे ऋण फेडावे असे आवाहन  सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी याप्रसंगी बोलतांना केले.

या प्रसंगी महालॅब चे  शुभम तुसे, प्रदीप वाघचौरे, भरत आल्हाट, रक्तदाते प्रशांत गायकवाड, प्रकाश सोनवणे, दिग्विजय पाटील, स्वाती शिंदे, किरण टूपके  महाविद्यालयाचे पंकज साळुंके, नितीन गायकवाड, किशोर पठारे यांच्यासह रक्तदाते उपस्थित होते.