वैजापूरच्या उपविभागीय अधिकारीपदी डॉ.अरुण जराड तर तहसीलदारपदी सुनिल सावंत

वैजापूर ,१३ जून/ प्रतिनिधी :- वैजापूरच्या उपविभागीय अधिकारीपदी डॉ.अरुण जराड यांची तर तहसीलदारपदी सुनिल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची दोन महिन्यांपूर्वी शिर्डी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागी सेलू चे उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जराड यांची नियुक्ती शासनाने केली आहे. 

उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची शिर्डी येथे बदली झाल्याने तहसीलदार राहुल गायकवाड यांच्याकडे प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार सोपविण्यात आला होता. तहसीलदार राहुल गायकवाड यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी सुनील सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार सुनील सावंत हे यापूर्वी सिंदखेडराजा (जिल्हा-बुलढाणा) येथे कार्यरत होते.

उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची बदली होऊन दोन महिने उलटले तरी त्यांच्या रिक्त जागेवर नियुक्ती न झाल्यामुळे एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांची जातीची प्रमाणपत्रे सही वाचून पडून होती.