वैजापूर पालिकेतर्फ गणतंत्र दिनानिमित्त शहरात ‘तिरंगा’ स्ट्रीट लाईट

वैजापूर ,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला वैजापूर नगरपरिषदेतर्फे शहरातील स्ट्रीट लाईट पोलवर तिरंगा या ध्वज रंगामध्ये एलईडी लाईट लावण्यात आली.

नगराध्यक्षा शिल्पाताई राजपूत यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या तिरंगा लाईटमुळे शहर तिरंगामय झाले आहे. विशेष म्हणजे शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासून ते स्टेशन रोड पर्यंत एकाच आवाजात देशभक्तीपर गाणे ही ऐकावयास मिळणार आहे.