वैजापूर पालिकेतर्फे शहरातील चार महिला बचत गटांना 14 लाख 40 हजाराचे अर्थसहाय्य

वैजापूर,१४ जुलै /प्रतिनिधी :- प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत वैजापूर नगरपालिका व कौशल्या शहरस्तरीय संघाच्यवतीने चार महिला बचत गटांना प्रत्येकी तीन लाख 60 हजार रुपयांचे बीज भांडवल उपलब्ध करण्यात आले.

दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग करत असलेल्या स्वयंसहायता बचत गटांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील बीज भांडवलाचा लाभ उपलब्ध करण्यात येतो. या योजनेतील कर्जावरील अनुदान या घटकांतर्गत गटांना लाभ देण्यात येणार आहे. घेतलेल्या कर्जावर 35 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करावा असे आवाहन मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी केले. नगराध्यक्षा शिल्पा परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्या हस्ते चार बचत गटांना एकुण 14 लाख चाळीस हजार रुपयांचे बीज भांडवल चेक द्वारे वितरित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा समन्वयक उमेश कहाणे यांनी बचत गटांना  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सहायक प्रकल्प अधिकारी सुनिल भाग्यवंत, समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन, कविता जाधव, सुर्यकांता काकडे, कौशल्या संघाच्या अध्यक्षा चित्रा थोरात, सचिव जयश्री सोनवणे उपस्थित होते.