वैजापुरात तिर्रट खेळणाऱ्या 13 जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडले

वैजापूर ,​१० मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील स्टेशन रस्त्यालगत गेल्या काही दिवसांपासून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास छापा टाकून तेरा जुगा-यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईलसंच व जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख 29 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

   शहरातील स्टेशन रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, व पोलिस उप अधिक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक पवन राजपूत, मनोज पाटील, पोलिस नाईक मोईस बेग, पंकज गाभुड, पवन सुंदरे यांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता गयास निजाम शेख (38,खंडाळा), सूरज गुंटूक (35 जालना), दीपक बनसोडे (31, वैजापूर), मदनसिंह परिहार (52, येवला), गजू सहानी (35, दहेगाव), हितेश रामैय्या (35, वैजापूर), नंदु टिपरस (40), अशोक गटकाळ (50), जालना, रईस शेख (34), रियाज कुरेशी 29), वैजापूर, अश्फाक शेख (38 खंडाळा), सनी राजपुत (31, वैजापूर) व संजय उगले (दहेगांव) असे 13 जुगारी जुगार खेळताना आढळून आले. चंद्रपाल राजपूत यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्यावर पैसे लावुन जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणी सर्व जुगारी गोलाकार करुन पैसे लाऊन तिर्रट जुगार खेळतांना पोलिसांना आढळून आले. त्यांच्याकडून 76 हजार 150 रुपये रोख व 53 हजार 624 रुपये किंमतीचे मोबाईल  असा एक लाख 29 हजार 774 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.