वसंत क्लब वैजापूरतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा आ.बोरणारे यांच्या हस्ते सत्कार

वैजापूर ,​२ ​जुलै / प्रतिनिधी :-वसंत क्लब वैजापूर या संस्थेतर्फे दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते रविवारी (ता.02) करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जराड हे होते.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, मेजर सुभाष संचेती, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा सरकारी वकील नानासाहेब जगताप,  शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, युवासेनेचे श्रीराम गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. क्लबचे सचिव जफर खान, सहसचिव डॉ.संतोष गंगवाल, सदस्य कय्युम सौदागर, अँड.संजय बत्तीसे, भगवानसिंग राजपूत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

या प्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जराड, माजी नगराध्यक्ष साबेर खान, डॉ.दिनेश परदेशी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संतोष गंगवाल यांनी केले. कार्यक्रमास अँड.प्रवीण साखरे, नगरसेवक दशरथ बनकर, गोटूसिंग राजपूत, बाळासाहेब जाधव यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.