वैजापूर येथे केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत भव्य मोटारसायकल रॅली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचा दौरा 

वैजापूर,१ ऑक्टोबर​ /प्रतिनिधी :-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगारमंत्री भुपेंद्र यादव दोन दिवसीय दौऱ्यावर असून याचाच एक भाग म्हणून वैजापूर येथे भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले होते.  केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या मोटारसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  

या मोटरसायकल रॅलीला केंद्रीय कामगार कल्याण मंत्री श्री भूपेंद्र सिंग यादव तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री डॉ.भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर,  जिल्हाध्यक्ष विजयराव औताडे , जिल्हा सरचिटणीस  डॉक्टर दिनेश परदेशी, संजयभाऊ खंबायते लक्ष्मण औटे, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, बाजार समितीचे सदस्य  ज्ञानेश्वर पाटील जगताप, नगरसेवक गणेश खैरे, उद्योग आघाडीचे कैलास पवार, अनिल वाणी, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत, नितीन जोशी, सूर्यकांत सोमवंशी, डॉ. बाबासाहेब डांगे यांच्यासह वैजापूर भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील विविध सर्कलचे पदाधिकारी उपस्थित होते. या मोटरसायकल रॅलीचे भव्य जाहीर सभेत रूपांतर झाले.