वैजापूर येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची आढावा बैठक

वैजापूर,२३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वैजापूर येथे शिवसेनेची आढावा बैठक झाली.शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत श्री. दानवे यांनी कार्यकर्त्यांशी पक्षसंघटना बांधणी संदर्भात चर्चा करून आढावा घेतला तसेच महिला आघाडीची तालुका कार्यकारिणी लवकरात लवकर जाहीर करण्याबत सूचना केली.

या आढावा बैठकीस शिवसेनेचे जेष्ठनेते तथा बाजार समितीचे माजी सभापती आसाराम पाटील रोठे, शिवसेना महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटक आनंदीबाईअन्नदाते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई पगारे, महिला आघाडीच्या तालुका संघटक वर्षाताई जाधव, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील सावंत, नंदकुमार जाधव, युवा सेनेचे विठ्ठल ढमाळे, प्रवीण सोनवणे,किशोर हुमे, मुरली थोरात, अक्षय साठे, बाळासाहेब जानराव, अनिल न्हावले यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.