मशिप्र मंडळावर पुन्हा आ.सतीश चव्हाण गटाचे हॅट्रीकसह निर्विवाद वर्चस्व

छत्रपती संभाजीनगर,२ जुलै  / प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची १० जुलै २०२३ ते ९ जुलै २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवडणूक आज  पार पाडली. यामध्ये आ.सतीश चव्हाण यांच्या गटाने हॅट्रीक साधत निर्विवाद वर्चस्व मिळवले व पुन्हा एकदा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर आपली सत्ता कायम राखली.

        मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या घटनेतील तरतूदीनुसार कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या निवडीसाठी देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. म.शि.प्र.मंडळाने निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार व न्यासाच्या नियमावलीनुसार सदरील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. विशेष म्हणजे सदरील निवडणूक बिनविरोध झाली.

        मशिप्र मंडळाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

        1.प्रकाश सुंदरराव सोळंके- अध्यक्ष

        2.अमरसिंह शिवाजीराव पंडित- उपाध्यक्ष

        3.शेख सलीम शेख अहमद- उपाध्यक्ष

        4.सतीश भानुदासराव चव्हाण- सरचिटणीस

        5.अनिल सखाराम नखाते- सहचिटणीस

        6.प्रभाकरराव माणिकराव पालोदकर- सहचिटणीस

        7.किरण विजयकुमार आवरगावकर- कोषाध्यक्ष

        कार्यकारिणी सदस्य- 8.लक्ष्मणराव एकनाथराव मनाळ, 9.मोहनराव विनायकराव सावंत, 10.हेमंत रावसाहेब जामकर, 11.विवेकानंद दत्तात्रय भोसले, 12.आप्पासाहेब रामकृष्ण पाटील, 13.भारत भाऊसाहेब सोळंके, 14.त्रिंबकराव तुळशीराम पाथ्रीकर, 15.दत्तात्रय ज्ञानोबा पाटील, 16.डॉ.प्रकाश आसाराम भांडवलदार, 17.विश्वास भरत पाटील, 18.विजयकुमार निळकंठराव साळुंके, 19.कल्याण भानुदासराव तुपे, 20.जयसिंह धैर्यशील सोळंके, 21.विश्वास दौलतराव येळीकर

        आज झालेल्या निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड.दिपक पडवळे व सहायक निवडणूक अधिकारी ऍड. शैलेंद्र गंगाखेडकर यांनी काम पाहिले.