हिंदू नववर्ष स्वागत समिती तर्फे भव्य शोभायात्रा

छत्रपती संभाजीनगर,२२ मार्च  / प्रतिनिधी :-  हिंदू नववर्षानिमित्त  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संस्थान गणपती येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक पध्दतीने निघालेल्या शोभायात्रेत घोडे, उंट, चित्ररथ, सजीव, निर्जीव देखावे, भजनीमंडळ, वारकरी बालक,  यांच्यासह महिला व नागरिक सियावर प्रभुरामचंद्र की जय चा जयघोष करीत उत्साहाच्या वातावरण पार पडली.

हिंदू धर्मीयांसाठी भगवान श्री रामचंद्र हे महावंदनीय आहेत. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध करून अयोध्येत परतण्याचा पवित्र दिवस म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा यालाच हिंदू नववर्ष व गुढीपाडवा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.  छत्रपती संभाजीनगरात  पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात हिंदू संघटना व संप्रदायाचे अनुयायी हिंदू नववर्ष शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज बुधवारी हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजाबाजार येथील संस्थान गणपती भव्य शोभायात्रा शहराचे आराध्य दैवत राजाबाजार येथील संस्थान गणपतीची महाआरती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, स्वागत समितीचे अध्यक्ष जयवंत (बंडू) ओक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सियावर प्रभूरामचंद्र की जय, गर्वसे कहो हम हिंदू है जय घोष करीत भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. ढोलताशे, बॅण्डपथक, टाळकरी, महिला भजनी मंडळ, निल्लोड येथील वारकरी विद्यालयाचे विद्यार्थी, घोडे, उंट, सजीव व निर्जीव देखावे भव्य शोभायात्रेत सहभागी झाले होते.

विविध मंडळाचा सहभाग

जगदगुरू श्री नरेंद्राचार्य महाराज सांप्रदाय, राष्ट्रसंत श्री भैय्यू महाराज संप्रदाय,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,  मंदिर संरक्षरण राष्ट्रीय धर्म संसद विश्व हिंदु परिषद, आर्य समाज, बजरंग दल, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, हिंदु जनजागृत समिती, पतीत पावन संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्रमंडळ, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, जय चतुर्थी प्रतिष्ठान,  पुरोहित संघ, दिगंबर जैन पंचायत, योग वेदांत समिती, माहेश्वरी समाज, स्वास्तिक सोसायटी, शिवराम प्रतिष्ठान, गुजराती समाज, गुरुद्वारा समिती, रेणुकामाता मंदिर संस्थान, अखिल भारतीय कुमावत समाज, राजपूत संघटना  गुरुदेव सेवा मंडळ, किसनगिरी बाबा भक्त मंडळ, श्रीराम मंदिर ट्रस्ट, जनसेवा क्रिडा मंडळ, संत निरंकारी संघ, स्वाध्याय परिवार, अनिरुद्ध बापू उपासना फाऊंडेशन, सिंधी समाज, सुधांशु महाराज सांप्रदाय    दिगंबर जैन पंचायत, आर्ट ऑफ लिव्हिंग, वीरशैव लिंगायत, श्री पतंजली योगपीठ, भजनी महिला मंडळ, पेशवा युवा मंच, श्री भद्रा मारोती संस्थान, तिळवण तेली समाज, एकनाथ मंदिर ट्रस्ट, भारतीय योग संस्था  वारकरी संप्रदाय आदी सहभागी झाले होते.

या मार्गावरून निघाली शोभायात्रा

भव्य शोभायात्रेला संस्थान गणपती येथून प्रारंभ झाला. ही शोभायात्रा शहागंज, कपडा बाजार, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, संभाजीपेठ चौक, पेशवा चौक, महात्मा फुले चौक, नारळीबाग मार्गे खडकेश्वर येथील महादेव मंदीरात विसर्जीत करण्यात आली. ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. चौकाचौकात व रस्त्यावर शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी शरबत, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

या मिरवणूकीत शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, विश्वनाथ स्वामी, शहर संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, जिल्हा गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, ऍड. आशुतोष डंख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आंनद तांदुळवाडीकर, गणू पांडे, संतोष जेजूरकर, अनिल पोलकर, मोहन मेघावाले, सचिन खैरे, किशोर कच्छवाह, मिलिंद दामोधरे, पुरुषोत्तम कुलकर्णी, चंद्रकात गवई, दयाराम बसैय्ये, महिला आघाडीच्या सुनिता आऊलवार, सुनिता देव, प्रतिभा जगताप, कला ओझा, विद्या अग्निहोत्री, लक्ष्मी नरहिरे, मीरा देशपांडे, मंजूषा नागरे, युवा सेनेचे उपसचिव ऋषिकेश खैरे, हनुमान शिंदे, किरण तुपे, मच्छिद्र देवकर, भाऊ सुरडकर, प्रफुल्ल मालानी, महावीर पाटणी, राजेंद्र आदमाने, भिकनचंद चिचाणी, अभिजित पगारे, सुधीर नाईक, राजू तनवाणी, राजू खरे, किरण गणोरे, सुगंधकुमार गडवे, बंटी जैस्वाल, रतनकुमार घोंगते, मनोज संतान्से, कचरू वेळंजकर, जयसिंग होलिये, नारायणसिंग होलिये, राजन मेघावाले, प्रविण कडपे, सुहास मुुंगीकर, आनंद जहागिरदार, ज्ञानेश्वर आप्पा खर्डे, शिवा लुंगारे, राजू इंगळे, विरभद्र गादगे, जया गुदगे, शिवा खांडगुळे, राजेश कोठाळे, हरमिंदसिंग बिंद्रा, रणजितसिंग गुलाटी, नरेंद्रसिंग जबिंदा, सुरदरसिंग साबरवाल, सुधिर विद्धंस, अ‍ॅड. राजू पहाडिया, लक्ष्मीनारायण बाखरिये यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  श्रीरामाचे नामस्मरण करत १०८, भागवताचार्य गोपालानंद महाराज पारलेश्वर संस्थान कन्नड, यांच्या अमृतवाणीने या शोभायात्रेचा समारोप खडकेश्वर शिवमंदिर येथे करण्यात आला.