जितेंद्र आव्हाड म्हणतात पक्षातील आमदारांनी माझाच व्हीप!

जितेंद्र आव्हाड राज्याच्या विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते!

मुंबई: अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठे बदल झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

पक्षातील सर्व आमदारांना माझाच व्हिप लागू होणार. मी शरद पवारांना सोडून कुठेही गेलो नसतो. शरद पवारांनी इतकी पदं देऊन सुद्धा वेगळी भूमिका घेतली. सरकारसोबत जाण्यासाठी मला कोणीही विचारलं नाही. मी मेलो तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही. जे आमदार सोडून गेले त्यांच्या मतदारसंघात संताप व्यक्त केला जातोय. ६ तारखेच्या बैठकीत आमदारांनी चर्चा करायला हवी होती. पक्ष आणि चिन्ह कोणीही घेऊ शकत नाही. शरद पवारांना अशा परिस्थितीत आणणं ही वाईट गोष्ट आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

अनेकांचे नातेवाईक फोन करुन सांगत आहेत की, आम्ही त्यांना समजावतोय. खरंतर या अवघड स्थितीकडे संधी म्हणून पहावं लागेल, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.