वैजापूर आगरासमोर एस.टी. कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू

माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची उपोषणकर्त्यांशी चर्चा

वैजापूर ,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यासह विविध मागण्यांसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी येथील एस.टी.आगरासमोर आजपासून (ता.28) बेमुदत उपोषणास सुरु केले आहे. या उपोषणामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होणार आहे.

Displaying IMG_20211028_135251.jpg

एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, वार्षिक वेतन वाढीचा दर 3 टक्के करण्यात यावा,राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता देण्यात यावा,राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे घरभाडे भत्ता देण्यात यावा, दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस देण्यात यावा आदी मागण्यांसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष पी.एस.जाधव, सचिव आर.एस.मुळे, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स (इंटक) चे अध्यक्ष एस.एस.मोरे, सचीव के.यु. पगारे,महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे अध्यक्ष पी.एफ.बनकर, सचीव दिपक तुपे,महाराष्ट्र एस.टी.कास्टराईब संघटनेचे अध्यक्ष एस.ए.धनेधर,सचीव एस.बी.धनेधर या संघटना पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी झाले आहेत.शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान व तालुकाप्रमुख वाणी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी मागण्यासंदर्भात चर्चा केली.