धुळे हॉस्पिटल औरंगाबादतर्फे वैजापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर ; दोनशे रुग्णांची तपासणी

वैजापूर,२० मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ.बाबूराव भिमाजीराव धुळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने धुळे हॉस्पिटल औरंगाबादतर्फे वैजापूर येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.  

Displaying IMG-20220320-WA0117.jpg


वसंत क्लब येथे आयोजित या शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ.व्ही.जी. यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. मेजर सुभाष संचेती, व्यापार संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ गायकवाड, भगवाननाना तांबे, डॉ.संतोष गंगवाल, प्रा. के.ए.मगर, प्रा.के.एम.बोरणारे, साहित्यिक प्रा.भीमराव वाघचौरे, केदारनाथ हरदास, अशोक धसे, डॉ.चैतन्य तांबे, डॉ. दिनेश राजपूत, संजय अभंग, संजय बत्तीसे, वसंतराव कदम, आसर आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.

शिबिरात डॉ.अनिल धुळे (अस्थिरोग तज्ञ) व डॉ. सुनील धुळे (मधुमेह व हृदयरोग तज्ञ) यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला दिला. बीएमडी उपकरणाद्वारे हाडांची ठिसूळता, रक्तशर्करा,डायबेटिक फूट तपासणी करून औषधीचे वाटप करण्यात आले.     

डॉ. कुंदा धुळे (भूलतज्ञ), डॉ.पल्लवी हरदास व डॉ. सिमंतिनी यांनी गंभीर रुग्णांचे सीपीआर प्रणालीद्वारे प्राण वाचविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.या शिबिरात अस्थिरोग, मधुमेह, मणक्याचे आजार, डायबेटिक, हृदयरोग तपासणी करून रुग्णांना औषधींचे वाटप करण्यात आले. जवळपास दोनशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.