टुणकी येथे ८१​ लाख रुपये निधीच्या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,​४​जून/ प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील टुणकी येथे विविध विकास कामांसाठी शासनाच्या विविध योजनांतर्गत 81 लाख रुपये निधी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून या निधीतील विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण आ. बोरणारे यांच्या हस्ते रविवारी (ता.04) करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव निकम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश घेतला. 

या प्रसंगी आ. रमेश बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची भाषणे झाली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, बाजार समितीचे रामहरी  जाधव, माजी सभापती भागीनाथराव मगर, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंह राजपूत, तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे,  साहेबराव पाटील औताडे, शहरप्रमुख पारस घाटे, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील जगताप, गोरख आहेर, गणेश इंगळे, प्रविण पवार, प्रशांत त्रिभुवन, युवासेना जिल्हाप्रमुख भरत कदम, जिल्हासमन्वयक अमीर अली, तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, उपतालुकाप्रमुख सोमनाथ भराडे, विभागप्रमुख अंबादास खोसे, प्रभाकर जाधव, राजेंद्र जाधव, पांडुरंग जगदाळे, ज्ञानेश्वर ठूबे, चांगदेव जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.