ग्रंथोत्सवाचे 26 व 27 नोव्हेंबर रोजी आयोजन

औरंगाबाद, २४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 26 व 27 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ प्रदर्शन, विक्री व विविध कार्यक्रम होणार आहेत. या ग्रंथोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन औरंगाबाद ग्रंथोत्सव समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

            या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शनिवार 26 नोव्हेंबर  रोजी सकाळी 10.30 वा. ज्येष्ठ साहित्यिक, समिक्षक डॉ.सुधीर रसाळ यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथोत्सव मध्ये अण्णाभाऊ साठे व जी.ए.कुलकर्णी ग्रंथ दालन तसेच विविध कार्यक्रमासाठी कवयित्री शांताबाई शेळके, शंकर रमाणी व्यासपीठ व वसंत बापट प्रेक्षागृह उभारण्यात येणार आहे.

            यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड अध्यक्षस्थानी राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री  जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सय्यद इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, हरिभाऊ बागडे, संजय सिरसाट, प्रशांत बंब, प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपुत, रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपजिल्हाधिकारी डॉ. अंजली धानोरकर, ग्रंथालय संचालक सुभाष मुंढे, शासकीय विभागीय ग्रंथालय ग्रंथपाल गुलाबराव मगर उपस्थित राहणार आहे.

            ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी 9 वा.ग्रंथ दिंडी क्रांती चौक ते कार्यक्रम स्थळ पर्यंत निघणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, शिक्षणधिकारी एम.के. देशमुख, उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय एस.एन.साबळे राहणार आहे.

            यावेळी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिका सामुहिक वाचन होईल. दुपारी 2 वा. परिसंवादाचे आयेाजन करण्यात येणार आहे, या परिसंवादात ‘वाचक बहुसंख्य पर्यायात हरवत चालला आहे’ यावर परिसंवाद होईल. या परिसराच्या अध्यक्षस्थानी डॉ. रा.शं बालेकर असून सहभाग डॉ. रमेश रावळकर, डॉ.शिवाजी हुसे, डॉ.रामचंद्र काळुंखे, डॉ.महेश खरात, डॉ.अस्मिता जाधव तसेच सायं 5 वा. हास्यरंग ‘थोडं बसा आणि भरपूर हसा’ सादरकर्ते हास्य कवि प्रा.डॉ. विष्णु सुरासे मराठवाडा एक्सप्रेस हे आहेत.

            दुसऱ्या दिवशी रविवार 27 नोव्हेंबर सकाळी 11 वा. “ भारतीय आणि मराठवाडा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व लोकशाहीचे भवितव्य” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ..ऋषिकेश कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक व समिक्षक सहभाग डॉ.कैलास अंभुरे, डॉ.अनिरुद्ध मोरे, डॉ.इकबाल मित्रे, दुपारी 2 वा. काव्यवाचन अध्यक्ष – अभय दाणी, सहभाग- आशा डांगे, ज्योती सोनवणे, माधुरी चौधरी, पंजाबराव मोरे, भास्कर पाटील, सुनिल उबाळे, सुदाम मगर, हबीब भंडारे, प्रिया धारुरकर, रंजन कंधारकर, सुत्रसंचलन- निलेश चव्हाण यांचा सहभाग असणार आहे.

            ग्रंथपदर्शन व विक्री सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार आहे. या ग्रंथोत्सवाचा समारोप दुपारी 4 वा. होणार आहे. यावेळी सहायक आयुक्त मानव विकास आयुक्तालय विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, ग्रंथपाल सुभाष मुंडे, मराठवाडा साहित्य परिषेदेचे कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, यांच्या उपस्थित होणार आहे.

            ग्रंथोत्सावाला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष तथा‍ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, सदस्य्‍ एम.के. देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी केले आहे.