सद्गुरु मार्ग आणि सिध्दांतापासून किंचितही विचलीत होत नाहीत(स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय)

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

धीरज अचल सुमेरु सम, विघ्न आय फिर जाय । 

 डीगे धीर न तील भर, धीर अगम गम पाय ।।१६।। 

(स्वर्वेद तृतीय मण्डल दशम अध्याय) ०३/१०/१६

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

धैर्यवान पुरूष सुमेरु पर्वतासमान अचल, दृढ असतात ज्यामुळे विघ्नं येऊन परत जातात. ते तीळमात्रही आपलं पद आणि सिद्धांत ज्ञानापासून विचलीत होत नाहीत. त्याप्रमाणेच अध्यात्म-मार्गात धीर संत आपल्या प्रकृतीपार आणि अनुभवगम्य मार्गावर अग्रेसर होऊन आपलं लक्ष्य गाठतात. अनेक विघ्न-बाधा आल्यावरही आपल्या सद्गुरु मार्ग आणि सिध्दांतापासून किंचितही विचलीत होत नाहीत.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.