औरंगाबाद जिल्ह्यात 144 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 46399 कोरोनामुक्त, 787 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 20 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 57 जणांना (मनपा 49, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46399 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 144 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48437 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1251 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 787 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (126)गारखेडा (1), जयसिंगपुरा (1), छत्रपती नगर, हर्सुल (1), कांचनवाडी (1), बन्सीलाल नगर (1), न्यू श्रेय नगर (3), बीड बायपास (4), जय भवानी नगर (2), ज्योती नगर (1), सातारा परिसर (8), बालाजी नगर (1), टाऊन सेंटर (2), एन पाच सिडको (1), ऊर्जा नगर, सातारा परिसर (2), आलोक नगर (1), शिवशक्ती कॉलनी (1), छत्रपती नगर, गारखेडा (1), नवाबपुरा, मोंढा (1), पानदरिबा (1), एन चार सिडको (3), जुनी एसटी कॉलनी (1), एन दोन सिडको (1), टिळक नगर (1), सावरकर नगर (1), विठ्ठल नगर (1), गुलमंडी (1), हायकोर्ट कॉलनी, पेशवे नगर (2), अमृतसाई गोल्ड सिटी, पैठण रोड (1), गुरूप्रसाद नगर, बीड बायपास (1), न्यू अन्सार कॉलनी, पडेगाव (1), चिकलठाणा (1), घाटी परिसर (3), कोटला कॉलनी (1), मिटमिटा (1), जवाहर कॉलनी (1), शिवनेरी कॉलनी (1), वसंत कॉलनी (1), गायकवाड क्लासेस परिसर (1), पुंडलिक नगर (1), विशाल नगर (2), लक्ष्मी नगर (1), नवराज सन्फ्लॉवर (1), विश्वभारती कॉलनी (1), न्यू हनुमान नगर (1), ज्योती नगर (1), साई श्रद्धा पार्क (1), सारंग सो. (1), एन सात, सिडको (2), आदित्य नगर, गारखेडा (4), श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट, सातारा परिसर (1), विद्या नगर (1), एन सहा सिडको (1), उल्कानगरी (1), सन्मित्र कॉलनी (2), दिशा नगरी (2), अन्य (44)

ग्रामीण (18)वरझडी (1), वाकोद जि.प. शाळा(1), तिसगाव, वाळूज (1), डावरवाडी, पैठण (1), सारोळा, सिल्लोड (1), अन्य (13)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील 55 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.