नांदगाव-जरूळ रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन

वैजापूर येथे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत रोहयो व पाणंद रस्ते योजना बाबत आढावा बैठक 

Displaying IMG-20211213-WA0213.jpg

वैजापूर,१३ डिसेंबर /प्रतिनिधी :-राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत सोमवारी वैजापूर येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.नांदगाव-चांडगांव ते जरूळ या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन, मनरेगा  व मातोश्री पाणंद रस्ते योजना यासंदर्भात तालुकास्तरीय बैठक, सदगुरु दत्तगिरी महाराज आश्रमास भेट तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी भेट चर्चा आदी कार्यक्रम पार पडले.
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सीआरएफ) या शिर्षकांतर्गत मंजूर झालेल्या वैजापूर तालुक्यातील नांदगाव- चांडगांव ते जरूळ या 3 कोटी 47 लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्याचे मजबुती व डांबरीकरण कामाचे भूमीपूजन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात भुमरे यांच्या उपस्थितीत मनरेगा व मातोश्री पाणंद रस्ते योजना यासंदर्भात तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.

या आढावा बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, पंचायत समितीच्या सभापती सिनाताई मिसाळ, शिवसेनेचे जेष्ठनेते आसाराम रोठे, संजय पाटील निकम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, मनाजी पाटील मिसाळ यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीनंतर संदिपान भुमरे, आ. अंबादास दानवे, आ. रमेश पाटील बोरणारे, माजी  नगराध्यक्ष साबेर खान आदींनी प.पु.दत्तगिरी महाराज आश्रमात सुरू असलेल्या जपानुष्ठान व गुरुचरित्र पारायण सोहळ्यास भेट देऊन दत्तगिरी महाराज यांचे दर्शन घेतले.  या दौऱ्यात संदिपान भुमरे व आ.अंबादास दानवे, आ. रमेश पाटील बोरणारे यांनी माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या कार्यालयास भेट देऊन साबेर खान यांच्याशी तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.यावेळी उपस्थित तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही त्यांनी भेट घेतली. उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हा परिषदेचे  शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, बाजार समितीचे संचालक संजय पाटील निकम, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, भाऊसाहेब गलांडे, बाळासाहेब जाधव, नगरसेवक प्रकाश चव्हाण, पारस घाटे, वसंत त्रिभुवन, महेश बुणगे, युवासेनेचे आमेर अली, श्रीराम गायकवाड, श्रीकांत साळुंके, सुलतान खान, शाखाप्रमुख आवेज खान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.