नव्या पिढीला राष्ट्रवादीच्या विचारधारेशी जोडावे – जयंत पाटील

 “राष्ट्रवादी परिवार संवाद” कार्यक्रमांतर्गत गंगापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक

खुलताबाद ,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- कुशल संघटनात्मक बांधणी तसेच नव्या पिढीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जोडून घ्यावे असे आवाहन  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गंगापूर येथे केले.

“राष्ट्रवादी परिवार संवाद” कार्यक्रमांतर्गत आज गंगापूर औरंगाबाद येथे गंगापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.


यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार  विक्रम काळे, ज्येष्ठ नेते जयसिंग गायकवाड, आमदार  सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी आमदार अण्णासाहेब माने, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, डॉक्टर सेल चे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, विलास चव्हाण, संतोष माने,  गंगापूरचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर निळ, खुलताबादचे  तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, महेश उबाळे,  रवी माहोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.