कापूसवाडगाव सोसायटीच्या चेअरमनपदी पंजाबराव थोरात यांची निवड

वैजापूर,​७​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पंजाबराव थोरात व व्हाईस चेअरमनपदी दत्ता थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. थोरात यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बाजार समितीचे माजी  सभापती व ज्येष्ठ संचालक संजय निकम, ज्ञानेश्वर जगताप, रावसाहेब जगताप, राजेंद्र कराळे, बद्री गायकवाड यांनी सत्कार केला. यावेळी विजय सिनगर,अशोक थोरात, प्रकाश थोरात, नानासाहेब थोरात,भानुदास धामणे, संचालक मंडळ सुनील थोरात,रयभान पा.वाळुंज, सुभाष फुकटे,पी के मोठे , सुनील निगळ, राहुल खरमाळे, वसंत थोरे, कृष्णा गवळी, छबुराव फुकटे, बाळासाहेब कदम, लताबाई थोरात, गोरख गिरी, विलास कापसे, शितल पंडित, लताबाई थोरात उपस्थित होते.