वैजापूर शहरातील पाटील गल्ली परिसरात श्री.शनेश्वर मूर्तीची स्थापना

वैजापूर,​५​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-श्रावण महिन्याचे औचित्य साधत शहरातील पाटील गल्ली येथील नागरिकांनी एकत्र येऊन “श्री शनेश्वर” मूर्तीची स्थापना बुधवारी (ता.3) मारोती मंदिर परिसरात केली.

माजी आमदार कै.आर.एम. वाणी यांची पाटील गल्लीत “श्री शनेश्वर” मंदिर असावे अशी प्रबळ इच्छा होती ती आज फळाला आली. यानिमित्त सकाळी प्राणप्रतिष्ठा पूजा, मूर्तीची मिरवणूक काढण्यात येऊन उपस्थित भक्त भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या संस्थेचे विश्वस्त उत्तमराव साळुंके, अण्णासाहेब शेळके, शिवाजी शेटे, पोपट भोसले, लिमेश वाणी, बापू गावडे, राजेंद्र साळुंके, परशराम आलूले,-उल्हास साळुंके, रंजक शेटे, रामकृष्ण पुतळे, अविनाश खांबेकर यांनी सहभाग नोंदविला. या प्रसंगी पोलीस पाटील गुलाबराव साळुंके, धोंडीरामसिंह राजपूत, सचिन सुरजमल राजपूत, श्री उगले, बी,बी,थोरात आदी उपस्थित होते.