वैजापूर शहरात “हर घर तिरंगा” जागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची फेरी

वैजापूर,​५​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वैजापूर शहरातील नागरिकांमध्ये “हर घर तिरंगा” या बाबत जागृती व्हावी म्हणून येथील कन्या प्रशालेच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शहरातून  जागृती फेरी काढून जनजागृती केली.  

या फेरीला स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी संबोधित केले तसेच पंचायत समिती परिसर व  गर्दीच्या ठिकाणी हर घर तिरंगा बाबत माहिती देऊन घरोघरी तिरंगा फडकवावा व क्रांतिवीरांच्या कथा वाचाव्यात तसेच या निमीत्ताने राष्ट्रभक्ती पर गीते लावावी असे आवाहन केले. मुख्याध्यापक एस. के.पगार, एस. सी. निकाळे, जे. पी.सूर्यवंशी, के.ए.सुरडकर, एन.जी,भोये, व्ही.सी.दहाटे यांनी “हर घर तिरंगा” या फेरीचे आयोजन करून जनजागृती करण्यात पुढाकार घेतला.