माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या जयंतीनिमित्त 4 जानेवारीला शिवसैनिकांचा मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा

वैजापूर ,१ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे माजी आमदार स्व. आर. एम.वाणी यांच्या जयंतीनिमित्त 4 जानेवारी रोजी शिवसैनिकांचा भव्य मेळावा व माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासोबत काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक रविवारी (ता.01) येथे पार पडली.

पंचायत समितीच्या स्व.विनायकराव पाटील सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संपर्कप्रमुख आसाराम रोठे, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ,  जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दिनकरराव पवार, शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण, तालुका संघटक मनोज पाटील गायके, पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र मगर, बाजार समितीचे उपसभापती रिखबसेठ पाटणी, खरेदी विक्री उपसभापती मंझाहरी पाटील गाढे, माजी सभापती प्रकाश शिंदे, बाजार समितीचे माजी संचालक भाऊसाहेब पाटील गलांडे, तालुका युवाअधिकारी विठठल पाटील डमाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.