वैजापूर-खंडाळा रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक ; एक ठार, एक जखमी

वैजापूर,​७​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना वैजापूर – खंडाळा रस्त्यावर मंगळवारी(ता.6) रात्री वाघमारे वस्तीजवळ घडली. दिलीप बाबुलाल सोनवणे (28) रा.खंडाळा यांचा या अपघातात मृत्यू झाला तर अमोल रोहीदास मोरे हे या अपघातात गंभीर जखमी झाले.सोनवणे व मोरे हे दोघे मोटार सायकल वर वैजापूरहून खंडाळा कडे येत होते.त्यावेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला.