आयकॉन चषक क्रिकेट:चित्तथरारक विजयासह एबीसी- क्रेडाई अंतिम फेरीत

औरंगाबाद,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  एमजीएम मैदानावर आयकॉन चषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत एबीसीने एसीईपी संघावर एका धावेने आणि क्रेडाईने आयकॉन इलाइट संघावर १० धावांनी चित्तथरारक विजय मिळवताना अंतिम फेरीत धडक मारली.

आज झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत मनाेज दरकने अजित मुळे याच्या साथीने ३७ चेंडूंत केलेल्या ४५ धावांच्या भागीदारीच्या बळावर क्रेडाई संघाने १५ षटकात ८ बाद ११५ धावा केल्या. मनोज दरकने ५ चौकार, ३ षटकारांसह ६२ आणि अजित मुळेने १० धावा केल्या. गणेश पगारिया, रौनक रुणवाल, संतोष सातारकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात आयकॉन इलाइटचा संघ ९ बाद १०५ धावापर्यंत मजल मारु शकला. त्यांच्याकडून सूरजने २८, सारंग बागलाने २२ व रौनक रुणवालने २० धावा केल्या. अखिलने ४, दीपक कुलकर्णीने २ व समीर सोनवणेने १ गडी बाद केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत एबीसीने १५ षटकांत ७ बाद १३२ धावा केल्या. त्यांच्याकडून शेख कैफने ४१, सागर कुमावतने ३३ विठ्ठल कुमावतने २६ धावा केल्या. नीरज देशपांडेने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात राहुल स्वामी व राहुल तोंडे यांनी ८ षटकांत केलेल्या ८० धावांच्या भागीदारीनंतरही एसीईपी संघ विजयापासून अवघ्या एका धावेने वंचित राहिला. राहुल स्वामीने ४६ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारांसह ६५ व राहुल तोंडेने ३७ धावा केल्या. प्रतिस्पर्धी संघाकडून शेख कैफने २ गडी बाद केले.

उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मनोजकुमार रजक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहा. आयुक्त जी. श्रीकांत यांची उपस्थिती राहणार आहे.

प्रदर्शनीय लढतीत जीएसटी स्पार्टन विजयी

या स्पर्धेअंतर्गत  राज्य उत्पादन शुल्क (जीएसटी स्पार्टन) आणि गव्हर्न्मेंट ऑफिसर यांच्यात प्रदर्शनीय सामना झाला. हा सामना जीएसटी स्पार्टन संघाने जिंकला. या सामन्यात जीएसटीचे सहआयुक्त जी. श्रीकांत, एमएसईडीसीएलचे सहसंचालक मंगेश गोंदवले, संतोष आहुळे, जीएसटी उपायुक्त संतोष श्रीवास्तव, उपजिल्हाधिकारी रामेश्वर रोडगे, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपारसे, सहा.आयुक्त धनजंय देशमुख, एमजीएमचे डीन डॉ. प्रवीण सुर्यवंशी, डॉ. गिरिष गाडेकर, कुलसचिव आशिष गाडेकर, आयकॉन स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, सुजीत सुर्यवंशी, अक्षयकुमार सवदे, सुरज शिंदे, रणजीत जाधव, प्रशांत जाधव, ज्ञानेश्वर दिंडे, राहुल आमले, जयंत नवरंगे, त्रिंबक बहुरे, राजु राजपूत, संतोष मेहर, रामदीन गजेंद्र, स्वप्नील जाधव, अभय करमरकर, सुरेश जाधव, विनोद आहेर पंकज पांडे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

———————————————————

आयकॉन स्टीलने आयोजित केलेली आयकॉन चषक स्पर्धा म्हणजे विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या क्रीडा प्रेमीसाठी आनंदाचे क्षण देणारी स्पर्धा आहे. आयकॉन स्टीलने वेळोवेळी अशा प्रकारच्या स्पर्धा घेऊन उत्तमप्रकारचे खेळाडू तयार करण्यासाठी प्रोत्साहान द्यावे जेणेकरून सर्व वयोगटातील खेळांडूना संधी मिळेल. 

जी. श्रीकांत, सहआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क

—————————————–

आयकॉन कप ने ही भव्य क्रिकेट स्पर्धा घेऊन बांधकाम क्षेत्रातील मान्यवर तसेच शासकीय अधिकारी यांना आपल्या दैनदिन जीवनात तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठीचा एकप्रकारचा बुष्टर डोस आहे. आयकॉन स्टीलने वेळोवेळी अशा स्पर्धांचे आयोजन करावे ही सदिच्छा.

 मंगेश गोंदवले,एमएसईडीसीएलचे सहसंचालक

—————————————————