कारवाईच्या भीतीने राऊत यांचे बेताल आरोप-केंद्रीय मंत्री नारायण राणे

राऊतांचा डोळा ठाकरेंच्या खुर्चीवर असल्याचा नारायण राणेंचा गंभीर आरोप!

आता शिवसेनेची भाजपवर कुरघोडी, सोमय्या-मोदी-राणेंविरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ’!

मुंबई ,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-आपले गैरव्यवहार उघडकीला येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेना नेते संजय राऊत हे अस्वस्थ झाले असून या अस्वस्थतेमुळेच ते भाजपा नेत्यांवर बेताल आरोप करू लागले आहेत. असे प्रतिपादन केंद्रीय मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केले.

शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून राज्यातले राजकीय वातावरण तापलेले असतानाच त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप करत सडकून टीका केली. नारायण राणेंनी आज संध्याकाळी मुंबईत भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या त्या पत्रकार परिषदेवर निशाणा साधतानाच संजय राऊतांनी भाजपावर केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.

Displaying LIV_5777.JPG

          भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके या प्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेने पछाडलेल्या राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटविण्याची सुपारी घेतली आहे. असा आरोपही राणे यांनी केला.

“संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, यांना हटवा, तुम्हालाच मुख्यमंत्री करतो. उद्धव ठाकरे जेव्हा सरकार स्थापनेबाबत पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे. मी आज ओळखतो का तुम्हाला?” असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

श्री.राणे म्हणाले की, मोठा गाजावाजा करत राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांना भाजप नेत्यांविरुद्ध सबळ पुराव्यानिशी आरोप करता आले नाहीत. राऊत यांनी पत्रकार परिषदेत बिनबुडाचे आरोप केले. राऊत यांच्याजवळ कोणाच्याही गैरव्यवहाराचे पुरावे असतील तर त्यांनी ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या स्वाधीन करावेत.

प्रविण राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबामुळे संजय राऊत हे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. आपल्या गैरव्यवहारांची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याने कारवाई होण्याची भीती त्यांच्या मनात आहे. या भीतीपोटी आलेल्या वैफल्यामुळे ते भाजपा नेत्यांवर असभ्य भाषेत आरोप करू लागले आहेत. सुजीत पाटकर यांच्या कंपनीत राऊत यांच्या कन्या संचालक कशा असा सवालही श्री.राणे यांनी केला.  

प्रवीण राऊतने ईडीला जी मुलाखत दिली त्यानंतर याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्याला आता अटक होणार हे समजले आहे. अनिल परब यांनाही अटक होणार आहे. आज सेना भवन आठवले का, असा सवालही राणे यांनी केला. स्वत:च्या डोक्यावर ईडी चौकशीची टांगती तलवार आहे. म्हणूनच राऊतांना घाम फुटला होता. ते वारंवार सांगत होते की मी कुणाला घाबरत नाही. मर्दांची शिवसेना आहे. पण मर्द माणसाला मर्द आहे हे सांगायची गरज नसते. जो घाबरतो, तोच वारंवार सांगत असतो की मी कुणाला घाबरत नाही”, असे राणे म्हणाले.

“संजय राऊतांचा थयथयाट सुरू”

“संजय राऊत का बेजबाबदारपणे घामाघूम होऊन बोलत होते? प्रविण राऊतांनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर हा थयथयाट सुरू झाला. का फक्त आरोप करता? पुरावे द्या ना? सुजीत पाटकर संजय राऊतांचे कोण लागतात? त्यांच्या नावाने इतके व्यवहार कसे करता? त्यांच्या कंपनीत संजय राऊतांच्या मुली कशा संचालक असतात?” असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

‘राऊत म्हणालेले, …तर साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे कपडे उतरविन’; नारायण राणेंनी सांगितला किस्सा

संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे आहे. ती वेळ आल्यावर बाहेर काढणार. राऊत हे शिवसेनेचे नाहीत, पूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना शिवसेना संपविण्यास सांगितले आहे. ठाकरेंना हटव शिवसेनेची खूर्ची तुला देतो, असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. तसेच सत्तास्थापनेच्या त्या रात्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेव्हा सिल्व्हर ओकवर शरद पवारांना भेटण्यास गेले तेव्हा राऊत हे एकटेच तिथे होते, असा आरोपही राणे यांनी केला.

साहेबांचे आणि उद्धवचे मी कपडे उतरवीन, मला पद दिले नाही तर पाहून घेईन, असे हे संजय राऊत एकदा बोलले होते. याचा साक्षीदार माझ्याकडे आहे. त्याला हवा तेव्हा समोर आणतो. माझ्यासमोर साहेबांबद्दल बोलला असता तर तिथेच आडवा केला असता. आता पदे मिळालीत म्हणून हे पैसे कमवायला आलेत. संजय राऊत हे पगारी नेता आहेत, सामनामध्ये काम करतात, अशी टीकाही राणे यांनी केली.

राऊत यांनी कधी कोणाच्या कानाखाली वाजविल्याची बातमी ऐकली आहे का, रग लागते त्यासाठी. याच्यात रक्तच नाही, अशा शब्दांत राणे यांनी टिका केली. तसेच आम्ही मंत्री आहोत, ईडी सीबीआयकडे जाऊन बसलो तर राऊत यांची पळता भुई थोडी होईल, असा इशारा राणे यांनी दिला.

शिवसेनेनं या नेत्यांच्या दाखविल्या जुन्या क्लिप

शिवसेनेचं "दाखव रे तो झी २४तासचा व्हिडीओ"; या नेत्यांच्या दाखविल्या जुन्या क्लिप

राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले, असा सवालही त्यांनी केला. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही त्यांनी टोला लगावला. यावेळी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना राऊत यांच्याबद्दल काय वाटायचे आणि राऊतांनी काय काय लिहिले आहे, याबाबतची कात्रणेही राणे यांनी वाचून दाखविली.

राऊतांनी किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. तर राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट राणे पिता-पुत्रांचे आणि किरीट सोमय्यांचे काही व्हिडीओच दाखवले!नारायण राणे आणि किरीट सोमैया यांच्या जुन्या व्हिडीओ क्लिप दाखवून “डोक्यावर नकली केस आले तरी बुद्धी येतेच असं नाही” असा सणसणीत टोला नारायण राणे यांना खासदार विनायक राऊत यांनी लगावला.   

विनायक राऊत म्हणाले की, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहे. बाळासाहेबांनीच त्यांना नेते केलं होतं. बाळासाहेबांनी राणेंना नेतेपद कधीही दिलं नाही. कारण हा माणूस सत्तापिपासू आहे हे त्यांना माहिती होतं. त्यातून राणेंची लायकी दिसून आली. संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत, त्याचबरोबर ते आमचे नेते आहेत. ईडीद्वारे त्यांना त्रास दिला गेला. पण ते खऱ्या अर्थाने शिवसैनिक असल्यामुळे निधड्या छातीनं सेनाभवनात पत्रकार परिषद घेतली. त्याउलट राणेंच्या मागे जेव्हा ईडी लागली तेव्हा ते आणि त्यांचे चिरंजीव दिल्लीला गेले आणि चोर वाटेनं भाजप नेत्यांच्या समोर लोटांगण घातलं, अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी राणेंवर केलीय. त्याचबरोबर ‘आज राणे यांना भाजप प्रेमाचा, मोदी प्रेमाचा कंठ फुटला आहे तो किती बेगडी आहे हे दिसून येतं. राणेंनी एक लक्षात घ्यावं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना कोरोनाचा काळ असूनही सर्व देशवासियांनी आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाच मुख्यमंत्र्यांमध्ये दोन वेळा उद्धव ठाकरेंना नामांकन मिळालं आहे. त्यात भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही’, असंही राऊत म्हणाले.