नराधम पित्याला जन्मठेप,दंडापैकी वीस हजारांची रक्कम पीडितेला

औरंगाबाद/प्रतिनिधी

स्वत;च्या नउ वर्षीय मुलीला नवीन चप्पल खरेदी करण्याच्या बहाण्याने घरातून नेत तिच्यावर एकाच दिवसात दोनदा बलात्कार करणार्या 35 वर्षीय नराधम पित्याला जन्मठेप आणि विविध कलमांखाली 58 हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी मंगळवारी दि.23 ठोठावली. विशेष म्हणजे ठोठाविण्यात आलेल्या दंडापैकी वीस हजारांची रक्कम पीडितेला देण्याचे आदेशत म्हटले आहे.

प्रकरणात पीडितेची 28 वर्षीय आईने फिर्याद दिली. त्यानूसार, गुन्हा घडण्यावेळी पीडिता ही तीसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. पीडितेचा नराधम पिता हा दारु पीण्याच्या सवयीचा आहे.

9 मार्च 2017 सायंकाळी पाच वाजात,आ रोपीने फिर्यादीला पीडितेला नवीन चप्पल घेवून देतो असे सांगत पीडितेला सायकलवर बसून देवगाव रंगारीला घेवून गेला. परंतू त्या रात्री आरोपी व पीडिता घरी आले नाही. दुसर्या दिवशी पीडितेला घरासमोर सोडून आरोपी बाहेरूनच पसार झाला. फिर्यादी पीडितेला आंघोळीसाठी घेवून गेली असता तिच्या पाठीवर मारहाणीचे वर्ण दिसल्याने फिर्यादीने पीडितेकडे चौकशी केली. तेंव्हा पीडितने सांगितले की, आरोपी हा पीडितेला देवगाव रंगारी येथे घेवून गेला, त्यानंतर त्याने चिकन घेतले व तेथून देवळांना रोडवरील एका शेतात पीडितेला घेवून गेला. तेथे आरोपीने पीडितेच्या शरिराशी अश्लिल चाळे केले, पीडितेने विरोध केला असता आरोपीने तिला बेदम मारहाण केली. रात्री आरोपीने ओळखीच्या महिलेकडून चिकनची भाजी करुन घेतली. त्यानंतर पीडितेला रात्री शेतात नेत तिच्यावर बलात्कार केला. प्रकरणात देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा

तपास अधिकारी तत्कालनी सहायक पोलीस निरीक्षक आर.जे. आडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता आरंवीद बागुल आणि ज्ञानेश्र्वरी नागुला/डोली यांनी नउ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडिता फिर्यादी आणि मुख्याध्यापकाचा जबाब महत्वाचा ठरला. दोन्ही बाजुच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने नराधम पीत्याला दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(i)(f) मध्ये जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड, कलम 324 मध्ये तीन वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम 4 मध्ये जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडा, पोक्सोच्या कलम 6 मध्ये जन्मठेप आणि वीस हजारांचा दंड, पोक्सोच्या कलम 8 मध्ये पाच वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम 12 मध्ये तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम 6 (1) मध्ये वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.