आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत डालिबोर सेव्हर्सिनाचा खळबळजनक विजय

भारताच्या अर्जुन कढे, इशाक इकबाल, एन विजय सुंदर प्रशांत, मनीष सुरेशकुमार यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश   

पुणे, 24 मार्च 2021:  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित 15000डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या पहिल्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या डालीबोर सेव्हर्सिना याने अव्वल मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का देत खळबळजनक निकालाची नोंद केली. तर, भारताच्या अर्जुन कढे, इशाक इकबाल, मनीष  सुरेशकुमार, एन विजय सुंदर प्रशांत या खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या डालीबोर सेव्हर्सिना याने भारताच्या अव्वल मानांकित सिद्धार्थ रावतचा 6-4, 6-1 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. डालीबोरने सिद्धांतचे आव्हान 1तास 28 मिनिटात मोडीत काढले. सामन्यात 2-1अशा फरकाने सिद्धांत आघाडीवर असताना डालीबोरने जोरदार कमबॅक करत सातव्या, नवव्या गेममध्ये सिद्धांतची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये देखील सिद्धांतला अखेरपर्यंत सूर गवसलाच नाही. या सेटमध्ये डालीबोरने वर्चस्व राखत दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सिद्धांतची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1असा एकतर्फी जिंकून विजय मिळवला. यावेळी डालीबोर सेव्हर्सिना म्हणाला की, गेल्या नोव्हेंबर नंतर माझी ही पहिलीच स्पर्धा आहे. मी थोडी विश्रांती घेतली. कारण मला माझ्या कामगिरीत सुधारणा घडवून आणायची होती. आजच्या सामन्याबद्दल सांगायचे तर पहिल्या सेटमध्ये मी फार चांगला खेळ केला नाही. पण दुसऱ्या सेटमध्ये त्याने महत्त्वाच्या क्षणी चुका केल्या. त्याचा फायदा घेऊन मी सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. हा विजय माझ्या कारकीर्दीसाठी महत्त्वाचा आहे.

Displaying Manish SURESHKUMAR of India.jpg


भारताच्या सहाव्या मानांकित मनीष सुरेशकुमार याने इटलीच्या लोरेंझो बोकचीचा 6-1, 6-4 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 41मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये मनीषने आक्रमक खेळ करत लोरेंझोची चौथ्या व सहाव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-1 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सामन्यात 2-1 अशा फरकाने मनीष आघडीवर असताना लोरेंझोने मनीषची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर मनीषने चतुराईने खेळ करत नवव्या गेममध्ये लोरेंझोची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवला. 

Displaying Arjun KADHE of India...jpg

भारताच्या सातव्या मानांकित अर्जुन कढे याने एस डी प्रज्वल देवचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(3) असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना 1तास 50मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये अर्जुनच्या बिनतोड सर्व्हिस व आक्रमक खेळीपुढे देवची खेळी निष्प्रभ ठरली. या सेटमध्ये अर्जुनने दुसऱ्या, सहाव्या गेममध्ये देवची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या देवने तोडीस तोड खेळ केला. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये अर्जुनने सुरेख खेळ करत हा सेट 7-6(3)असा जिंकून विजय मिळवला.

Displaying Ishaque EQBAL of India..jpg

पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या इशाक इकबालला पुढे चाल देण्यात आली. सामन्यात पहिला सेट इशाकने लुका विरुद्ध 6-3 असा सहज जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये 2-0 अशी स्थिती असताना लुकाला हाताला दुखापत झाल्यामुळे त्याने सामन्यातून माघार घेतली. क्वालिफायर भारताच्या एन विजय सुंदर प्रशांत याने फैजल कुमारचा 6-4, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

Displaying Dominik PALAN of CZE.jpg


स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली(मुख्य ड्रॉ)फेरी: एकेरी:डालीबोर सेव्हर्सिना(चेक प्रजासत्ताक)वि.वि.सिद्धार्थ रावत(भारत) [1] 6-4, 6-1;
डॉमिनिक पॅलन(चेक प्रजासत्ताक)वि.वि.रणजीत विराली-मुरुगुसेन(भारत) 7-6(6), 6-1;
मनीष सुरेशकुमार(भारत) [6]वि.वि.लोरेंझो बोकची(इटली)6-1, 6-4;
झेन खान(अमेरिका)[8]वि.वि.अभिनव शाण्मुगम(भारत)6-2, 6-0;
अर्जुन कढे(भारत) [7]वि.वि.एस डी प्रज्वल देव(भारत)6-3, 7-6(3);
ऑलिव्हर क्रॉफर्ड(अमेरिका)[4]वि.वि.अथर्व शर्मा(भारत)6-1, 6-0;
एडन म्युकुक(ग्रेट ब्रिटन) [3]वि.वि.ओमनी कुमार(अमेरिका) 6-2, 7-6(4);
एन विजय सुंदर प्रशांत(भारत)वि.वि.फैजल कुमार(भारत)6-4, 6-2;
इशाक इकबाल(भारत)वि.वि.लुका कॅस्टेलनुव्हो(स्वित्झर्लंड)6-3, 2-0सामना सोडून दिला;
सिमॉन कार(आर्यलँड) [2]वि.वि.ध्रुव सुनिश(भारत)6-2, 3-6, 6-4;

दुहेरी गट: पहिली फेरी: मार्को ब्रुगेनरोटो(इटली)/डेव्हिड पोझी(इटली)वि.वि.साहिल गवारे(भारत)/गुंजन जाधव(भारत) 2-6, 6-3, 10-8;
फिलीप बर्गेव्ही(स्वीडन)/जोनाथन म्रीधा(स्वीडन)[3]वि.वि.जोनाथन बायडिंग(ग्रेट ब्रिटन)/हेनरी पॅटन(ग्रेट ब्रिटन) (5)6-7, 6-3, 10-4.