शिवसेनेच्यावतीने कोरोना योद्धांचा कौटुंबिक सत्कार

भोईवाडा – नागेश्वरवाडी शाखेचा उपक्रम

औरंगाबाद ,२० सप्टेंबर /प्रतिनिधी :-गेल्या २ वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर राहून जनतेची सेवा वैद्यकीय विभागाने केली आहे. याची दखल घेत शिवसेनेच्यावतीने कोरोना योद्धांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव झाला. भोईवाडा – नागेश्वरवाडी शाखेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.   

 

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, उपशहरप्रमुख सुगंधकुमार गडवे, विभागप्रमुख विनायक देशमुख, उपविभागप्रमुख सुरेश व्यवहारे, योगेश डहाळे, मंगेश वाघमारे, साहेबराव साबळे, शाखाप्रमुख मयूर कंटे, परेश झिरपे, हिरालाल बिरुटे, उप शाखाप्रमुख कुमार देशमुख, आदित्य आहेरकर, गटप्रमुख पवन मुंढे, राहुल कुलथे, टिनू मुंढे, युवासेनेचे विभाग अधिकारी मयूर सोळंके, गौरव पाकोलु ,महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक नलिनी बाहेती, शहर संघटक प्राजक्ता राजपूत, विभागप्रमुख रुख्मिनी पवार, कविता पाटील, जाधववर,  आयोजक संगीता पाकोलू, ललिता श्रावण उदगे, मंजुषा कुलकर्णी, डॉ. उज्वला झंवर, डॉ. अमृता साहुजी, किशोर उढाण, सुषमा पाटील, सौरभ मोरे, डॉ. सुरेश बैरागी, डॉ. प्रशांत धुळे, डॉ. कमलेश अवचट, डॉ. बेजरगे, डॉ. सुभाष साहुजी, डॉ. रमेश लड्डा, डॉ. रणवीर वैष्णव, डॉ. स्नेहा गड्डपा, मनीषा दौड आदींची उपस्थिती होती.